• Sat. Oct 31st, 2026

आंतरजिल्हा चोरट्यांच्या टोळीचा बीड पोलिसांकडून पर्दाफाश; ९ लाखांचा मुद्देमाल जप्त, चार आरोपी अटकेत! नेकनूर, केज, दिंद्रुड परिसरातील घरफोडी व वाहनचोरीचे चार गुन्हे उघडकीस

Bybaba maske

Oct 31, 2026

आंतरजिल्हा चोरट्यांच्या टोळीचा बीड पोलिसांकडून पर्दाफाश; ९ लाखांचा मुद्देमाल जप्त, चार आरोपी अटकेत!

नेकनूर, केज, दिंद्रुड परिसरातील घरफोडी व वाहनचोरीचे चार गुन्हे उघडकीस

रोखठोक न्यूज | बीड

बीड जिल्ह्यातील घरफोडी आणि वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि नेकनूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जालना जिल्ह्यातील आंतरजिल्हा गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश करत चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तब्बल ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे नेकनूर, केज आणि दिंद्रुड पोलीस ठाण्यांत दाखल असलेले चार गुन्हे उघडकीस आले आहेत.

बीड जिल्ह्यातील नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४४१/२०२६, कलम ३०५, ३३१(४) भारतीय न्याय संहितेनुसार दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा बीड व नेकनूर पोलिसांकडून सुरू होता. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये दिसणाऱ्या संशयितांच्या हालचालींचा माग काढत गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींची माहिती मिळवली.

या तपासात १) बालसिंग अमलसिंग टाक (वय ३०), २) नानकसिंग माबलसिंग बावरी (वय २२), ३) अरुणसिंग जगतापसिंग बावरी (वय २०), तिघेही रा. संभाजीनगर, तिर्थपुरी, ता. घनसांगवी, जि. जालना आणि ४) इरफान बिनमिया सय्यद (वय २०, रा. ईट, ता. अंबड, जि. जालना यांचा सहभाग निष्पन्न झाला.

पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार ३० ऑक्टोबर २०२६ रोजी गेवराई बायपास परिसरात सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी बीड जिल्ह्यातील चोरीच्या घटनांमध्ये सहभाग असल्याची माहिती समोर आली.

या कारवाईत नेकनूर पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ४४१/२०२६, केज पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक १०/२०२६, दिंद्रुड पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ६२४/२०२६ आणि गुन्हा क्रमांक ०९/२०२६ असे एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून सुमारे ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पुढील तपासासाठी आरोपींना नेकनूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, सहायक पोलीस अधीक्षक श्री. व्यंकटराम आणि पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी वेताळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलीस हवालदार घोडके, जाफर पठाण, महेश जोगदंड, दिलीप गित्ते, चापोहे/गणेश मराडे, पोलीस अंमलदार विकी सुरवसे आदींनी केली.

आंतरजिल्हा गुन्हेगारांच्या टोळीला बेड्या ठोकत बीड पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील चोरीच्या घटनांच्या तपासाला मोठे यश मिळाले आहे.

रोखठोक न्यूज – जनसामान्यांच्या अन्यायाविरुद्ध आवाज

baba maske

Related Post

केज नगरपंचायतीचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर! मुख्य बाजारपेठेत सांडपाण्याचे साम्राज्य; व्यापारी, नागरिक त्रस्त नवरात्रापूर्वी पाडलेला चौक अद्याप दुरुस्तीच्या प्रतीक्षेत; खड्डे, दुर्गंधी आणि अपघातांनी नागरिक हैराण, बाजारपेठ बंद ठेवून आंदोलनाचा इशारा!
केज पोलिसांची सतर्कता! हरवलेले ११ मोबाईल शोधून मूळ मालकांना परत; नागरिकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य
दिवाळीच्या तोंडावर अतिक्रमणधारकांवर प्रशासनाचा हातोडा! दुष्काळात छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ?अंबाजोगाईत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शासकीय रुग्णालयापर्यंत दोन्ही बाजूंनी ५०-५० फुटांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम; वर्षभरात दुसऱ्यांदा कारवाई, नागरिकांत संताप!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!