परळी शहरात एका चाळीस वर्षीय इसमाचा खून झाला असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.या घटनेने परळी शहर पुन्हा एकदा हादरले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील तहसील कार्यालयासमोरील मैदानात महादेव दत्तात्रय मुंडे वय वर्ष 40 रा.भोपळा यांची धारदार शस्त्राने हत्या केल्याची पोलिसांना आढळून आले आहे.
पोलिसांनी सदर मयतास शवविच्छेदन करण्यासाठी परळी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात केले आहे.दरम्यान खूनाच्या घटनेने परळी शहर पुन्हा एकदा हादरले आहे.