• Mon. May 25th, 2026

दैनिक वादळ वार्ताचे संपादक पत्रकार अजय भांगे यांना राज्यस्तरीय क्रांती योद्धा पुरस्कार जाहिर

Bybaba maske

Oct 23, 2023

दैनिक वादळ वार्ताचे संपादक पत्रकार अजय भांगे यांना राज्यस्तरीय क्रांती योद्धा पुरस्कार जाहिर

रोखठोक न्युज वार्ताहर 

आपल्या आभ्यासु लेखणीच्या माध्यमातून पत्रकारीतेत एक वेगळा ठसा उमटवून निर्भीड पत्रकारिता करून दैनिक वादळवार्ता च्या माध्यमातून आन्यायाच्या विरुद्ध आवाज उठविणारे पत्रकार अजय भांगे यांना राज्यस्तरीय क्रांती योद्धा पुरस्कार जाहिर झाला आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र नवक्रांती शिक्षक व पदवीधर संघटना संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा, तालुकास्तरावर तथा गावपाळीवर काम करते. दरवर्षी सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या वेक्तींचा गौरव व्हावा यासाठी शिक्षण,सामाजिक, पोलीस दल,वकील पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांची दखल घेऊन त्यांना सन्मानित करावे असा उद्देश समोर ठेऊन संस्थापक अध्यक्ष उमेश म्हसाये यांच्या संकल्पनेतून दरवर्षी राज्यस्तरीय क्रांती पुरस्कार सोहळा संपन्न होत असतो,यावर्षी बीड जिल्ह्यातील केज येथील रहिवाशी दै. वादळवार्ताचे संपादक पत्रकार अजय भांगे यांना त्यांच्या उत्कृष्ट तथा निर्भिड पत्रकारितेची संस्थेने दखल घेत त्यांची राज्यस्तरीय क्रांती योद्धा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.व तसे पत्र देखील पाठविले आहे. दि २९ ऑक्टोबर रोजी ता,तेल्हारा जिल्हा अकोला येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती संस्थापक अध्यक्ष प्रा.उमेश म्हसाये, राज्याध्यक्षा श्रीमती पद्मावती टिकार, प्रा.संजय तुपे राज्यउपाध्यक्ष,यांनी दिली. याप्रसंगी पत्रकार अजय भांगे यांना राज्यस्तरीय क्रांती योद्धा पुरस्कार जाहिर झालेमुळे त्यांचे सर्वस्तरातून कौतूक व अभिनंदन केले जात आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!