• Wed. Jun 3rd, 2026

एसटी बस आणि दुचाकीची जोरात धडक एक जखमी, केज उपजिल्हा रुग्णालयासमोरील घटना. 

Bybaba maske

Oct 24, 2023

एसटी बस आणि दुचाकीची जोरात धडक एक जखमी, केज उपजिल्हा रुग्णालयासमोरील घटना. 

 

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज – एसटी बस आणि दुचाकीची जोरात धडक होऊन या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना केज – अंबाजोगाई रस्त्यावरील केज उपजिल्हा रुग्णालयासमोर सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. जखमींवर अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपाचार सुरू आहेत.

      गांजी ( ता. केज ) येथील रेवनसिंध सखाहरी पटणे ( वय ३९ ) हे सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास येथील उपजिल्हा रुग्णालयातून दुचाकीवरून ( एम. एच. ४४ एफ. ७८०४ ) शहराकडे निघाले होते. त्यांची दुचाकी रुग्णालयातून बाहेर केज – अंबाजोगाई रस्त्यावर आली. याचवेळी शहराकडून छत्रपती संभाजी नगरहून लातूरकडे चाललेली लातूर आगाराची एसटी बसची ( एम. एच. २४ ए. यू. ८३३५ ) व दुचाकीची समोरासमोर जोराची धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील रेवनसिंध पटणे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस नाईक त्रिंबक सोपणे यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!