• Thu. Apr 30th, 2026

भ्रष्टाचाराचा आरोप आसणाराच करणार भ्रष्टाचाराची चौकशी.केज पंचायत समितीचा अजब कारभार. तक्रारकर्त्याचा यांचा आरोप.

Bybaba maske

Oct 25, 2023

भ्रष्टाचाराचा आरोप असणारा करणार भ्रष्टाचाराची चौकशी.

केज पंचायत समितीचा अजब कारभार. तक्रारकर्त्याचा यांचा आरोप.
रोखठोक न्युज वार्ताहर
केज – होळ ( ता. केज ) येथील ग्रामपंचायतीमार्फत झालेल्या विकास कामात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारीवरून जिल्हा परिषदेने केज पंचायत समितीस चौकशी समिती नेमून चौकशी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र पंचायत समितीने एका लाचलुचपत प्रकरणात अडकलेल्या अधिकाऱ्याची भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नियुक्ती केल्याचा आरोप तक्रारकर्ते सचिन चव्हाण यांनी केला आहे.

केज तालुक्यातील होळ ग्रामपंचायतीत विकास कामात तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच, संबंधित लोकप्रतिनिधी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते सचिन चव्हाण यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करीत या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषीविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. या तक्रारीची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पंचायत विभाग ) यांनी एका पत्राद्वारे केज पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गटविकास अधिकाऱ्यांनी विस्तार अधिकारी (पं.) रामचंद्र रोडेवार व कनिष्ठ अभियंता एस. डी. हातागळे यांची चौकशी करण्यासाठी नियुक्ती केली आहे. मात्र चौकशी अधिकारी तथा विस्तार अधिकारी रामचंद्र रोडेवार यांच्याबाबत आक्षेप घेत रोडेवार हे स्वतः लाचलुचपत प्रकरणात अडकलेले असल्याने ते भ्रष्टाचाराची चौकशी निःपक्षपातीपणे कसे करू शकतील ? असा सवाल तक्रारकर्ते सचिन चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

चौकशी अधिकारी रोडेवार लाचखोर

चौकशीसाठी नेमलेले रामचंद्र रोडेवार हे माजलगाव तालुक्यातील केसापुरी कॅम्प येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत असताना ६ जून रोजी ग्रामपंचायतीचे लिपिक सचिन लहाडे यांच्याकडून जिल्हा परिषदेच्या सेवा जेष्ठता यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना माजलगाव पंचायत समितीच्या आवारात त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक श्री. धस यांच्या पथकाने रंगेहात पकडले होते. त्यांच्यावर माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून हे प्रकरण हे माजलगाव येथील सत्र न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!