• Thu. Sep 17th, 2026

भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना चालू कार्यक्रमात आली भोवळ, प्रकृती स्थिर असल्याची माहिती.

Bybaba maske

Mar 7, 2024

भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना चालू कार्यक्रमात आली भोवळ, प्रकृती स्थिर असल्याची माहिती.

रोखठोक न्युज वार्ताहर 

माजलगाव तालुक्यातील संगम येथे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या प्रवेशद्वाराचे लोकार्पण करण्यासाठी भाजप खा.डॉ.प्रीतम गोपिनाथ मुंडे या आल्या होत्या. कार्यक्रम सुरू असतानाच त्यांना स्टेजवरच अचानक भोवळ आली. यामुळे पाठिमागे असलेल्या खूर्चीवर त्या तात्काळ बसल्या. हा प्रकार मंगळवारी दुपारच्या सुमारास घडला.  

बीडमध्ये सकाळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी खा.मुंडे उपस्थित होत्या. तेथून त्या दिंद्रूड येथे गेल्या. तेथील चार खासगी कार्यक्रमांना हजेरी लावल्यानंतर संगम येथील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या प्रवेशद्वाराचे लोकार्पण करण्यासाठी त्या गेल्या होत्या. कार्यक्रम सुरू असतानाच त्या अचानक स्टेजवर कोसळल्या. जवळपास पाच मिनिट त्या बेशुद्ध असल्याची माहिती समोर येत आहे. 

त्यानंतर महिला आघाडीच्या नेत्या संजीवनी राऊत यांनी खासदार मुंडे यांना आधार देत गाडीपर्यंत नेले. तेथून त्यांना तातडीने परळी येथील निवासस्थानी हलविण्यात आले. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू असून प्रकृती चांगली असून घाबरण्याचे काहीच कारण नाही, अशी माहिती निकटवर्तीयांनी दिली आहे. ऊन, जेवण नसणे आणि धावपळ यामुळे ही भोवळ आल्याचे सांगितले जात आहे.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!