• Thu. Sep 17th, 2026

केज शहरातून आठवीच्या विद्यार्थिनीचे अपहरण

Bybaba maske

Mar 8, 2024

केज शहरातून आठवीच्या विद्यार्थिनीचे अपहरण

 

रोखठोक न्युज प्रतिनिधी 

केज शहरातून आठवीच्या वर्गातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या – अज्ञात व्यक्तीविरुद्ध केज पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.

केज तालुक्यातील एका गावातील आठवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीचे कुटुंब शहरात वास्तव्यास असून ५ मार्च २०२४ रोजी सकाळी ७.३० वाजता वडिलांनी मुलीसह तिच्या भावास दुचाकीवरून शाळेत सोडले. त्यानंतर दुपारी १२.३० वाजता तिचा भाऊ शाळेतून घरी पोहोचला. मात्र, ही मुलगी घरी न आल्याने वडिलांनी शाळेत जाऊन तिचा शोध घेतला तेव्हा शाळेत मुलीचे दप्तर व डबा वर्गात आढळून आला. शाळेच्या मधल्या

 

सुटीपासून मुलगी दिसून आली नाही. वडिलांनी नातेवाइकांशी संपर्क साधला. मात्र तिचा शोध लागत नसल्याने तिचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार केज पोलिस ठाण्यात दिल्यानंतर अज्ञातावर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी केले आवाहन

मुलीचा रंग गोरा, उंची पाच फूट, अंगात पांढरा टॉप, लाल पँट, लाल ओढणी असा शाळेचा पंजाबी ड्रेस असून पायात काळ्या रंगाची सायंडल आहे. कानात साधी फुले, हनुवटीवर मस, नाकात खडा अशा वर्णनाची मुलगी आढळून आल्यास पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन तपासी अधिकारी आनंद शिंदे यांनी केले आहे.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!