• Thu. Sep 17th, 2026

भगर खाल्याने विषबाधा:महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी काळजी घ्यावी.

Bybaba maske

Mar 8, 2024

भगर खाल्याने विषबाधा:महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी काळजी घ्यावी.

रोखठोक न्युज प्रतिनिधी.

एकादशीच्या दिवशी दि. 7 मार्च फराळात भगर पिठाचे पदार्थ खाल्याने शहरातील काही भागात अनेकांची प्रकृती बिघडली. त्यांना विषबाधा झाल्याचे निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. शहरातील मुख्य भागात असलेल्या शास्त्री चौकातील किराणा दुकानांतून भगर खरेदी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली या बाधितांना गेवराई येथील सरकारी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, बाधित 3 च्या आसपास आहेत एकादशी असल्याने भगर पिठाचे पदार्थ खाल्ले. यानंतर त्यांना मळमळ, उलट्या, पोटदुखी, हात पाय दुखणे, डोकेदुखी असा त्रास सुरू झाला. शहरातील सरकारी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. दिवसेंदिवस होत असलेल्या या घटनेमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे भगरीतून विष बाधा होणे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळणे असाच प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे अन्नपुरवठा भेसळ विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गेवराई शहरातील सर्व किराणा दुकानाकडे लक्ष घालून होत असलेली विक्री तात्काळ थांबवावी अशी मागणी होत आहे.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!