• Thu. Sep 17th, 2026

गरिब मराठ्यांचा हक्क डावलणाऱ्या सरकारला धडा शिकवण्या साठी रोहन गलांडे पाटील लोकसभा

Bybaba maske

Mar 8, 2024

 गरिब मराठ्यांचा हक्क डावलणाऱ्या सरकारला धडा शिकवण्या साठी रोहन गलांडे पाटील लोकसभा निवडणूक लढवणार

रोखठोक न्युज वार्ताहर 

मराठा आरक्षण मिळवण्यासाठी व सकल मराठा समाजाला आरक्षण मिळवण्या साठी मराठा समाज आग्रही आहे.पण सरकार ने दिलेले आरक्षण ना भेटते ना कोर्टात टिकते.गेले कित्येक दिवस शांततेत झालेले अंदोलन असो किंवा मोर्चे असो सरकार मराठा समाजाला फसवत आले आहे  म्हणून राज्य सरकारने केलेल्या सगेसोयरेच्या अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करावे व अंमलबजावणी तात्काळ करावी या मागण्या महाराष्ट्र शासनाने मंजूर केल्या नाहीत म्हणून समाजसेवक रोहन गलांडे पाटील बीड लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.तरी राज्य सरकारने तात्काळ सगेसोयरेच्या अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करावे अन्यथा लोकसभा निवडणुकीत हजारो मराठा बांधव रिंगणात उतरणार आहेत त्यांच अनुषंगाने रोहन गलांडे पाटील यांनी सुध्दा बीड लोकसभा निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची भुमिका स्पष्ट केली आहे.येणाऱ्या काळात सरकारची वाट लावल्याशिवाय व सरकार ला गाडल्याशिवाय सोडणार नाही.आज पहायला गेलो तर जवळपास सात महिन्यांपासून मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील आपल्या जिवाच रान करत आहेत परंतु सरकार झोपेतच आहेत म्हणून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत हजारो मराठा बांधव लोकसभा निवडणूक लढवणार मग सरकारला कळेल मराठा खडा तो सरकार से बडा या शब्दाचा अर्थ असे रोहन गलांडे यांनी म्हटले आहे.तरी येणाऱ्या निवडणुकीत प्रत्येक गावातुन तीन चार उमेदवार जाहीर करण्यात यावे लोकसभा निवडणूकीसाठी रिंगणात उतरावे व राज्य सरकारने केलेल्या सगेसोयरेच्या कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत सगळ्यानी मराठा बांधवांनी ऐक जुटीने लढायचे असे रोहन गलांडे पाटील यांनी म्हटले आहे.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!