• Thu. Sep 17th, 2026

देवेंद्र फडणवीस यांचे स्टेट्स ठेवले म्हणून मारहाण.

Bybaba maske

Mar 9, 2024

देवेंद्र फडणवीस यांचे स्टेट्स ठेवले म्हणून मारहाण.

रोखठोक न्युज प्रतिनीधी

सोशल मिडियात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्टेट्स शेयर केल्याचे रागातून दोघांनी एका तरूणास बेदम मारहाण केल्याची घटना तालुक्यातील लव्हुरी या गावी गुरुवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुरूवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास लव्हुरी येथील एका हॉटेल समोर बसलेल्या गणेश नागनाथ चाळक यास गावातीलच राहुल सर्जेराव चाळक आणि कैलास सुरेश चाळक या दोघांनी, तु तुझ्या सोशल मीडीयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचे स्टेटस का ठेवलेस? असा जाब विचारला. यारून त्यांच्यात वाद झाला. यातूनच कैलासने लोखंडी रॉडने गणेशच्या हातापायावर मारहाण केली. तर राहुलने गणेशला जिवे मारण्याची धमकी देत लाथाबुक्याने मारहाण केली. यावेळी अमोल इंदरराव चाळक, नागनाथ हरिभाऊ चाळक यांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला.

याप्रकरणी गुरुवारी (दि.7) मध्यरात्री साडे बारा वाजण्याच्या दरम्यान पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन व त्यांच्या सहका-यांनी गणेश चाळक याचा स्वाराति रुग्णालयात जवाब घेतला. शुक्रवारी सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान राहुल सर्जेराव चाळक व कैलास सुरेश चाळक (दोघेही रा लव्हुरी) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास जमादार राजू वाघमारे हे करीत आहेत.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!