• Thu. Sep 17th, 2026

परळीत सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचा परळी रेल्वे रुळावर आढळला मृतदेह.

Bybaba maske

Mar 9, 2024

परळीत सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचा परळी रेल्वे रुळावर आढळला मृतदेह.

 रोखठोक न्युज प्रतिनीधी.

परळी बीड पोलीस दलात असणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकची परळी रेल्वे स्टेशन दरम्यान साधारण पाचशे ते 400 मीटर अंतरावर सिमेंट फॅक्टरी च्या दरम्यान मृतदेह आढळला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत ही धक्कादायक घटना आज सकाळी समोर आली आहे. सदर मयताच्या शरीराचे दोन तुकडे झाल्याचे पहायला मिळाले.

प्राथमिक माहितीनुसार सुभाष दुधाळ असं मयताचं नाव आहे, रात्री घटना केव्हा घडली कोणत्या रेल्वे दरम्यान घडली स्पष्ट नाही आज दि.९ मार्च रोजी सात वाजता पोलिसांना स्टेशन मास्तरने सांगितल्यानंतर सदरील मृतदेह परळी येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात आणलेला आहे, या धक्कादायक घटनेने परळी शहरात मोठी खळबळ उडाली आहे.या बाबत अधिक तपास रेल्वे पोलीस करत आहेत.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!