• Thu. Sep 17th, 2026

परळी येथे रेल्वे खाली आत्महत्या केलेल्या पोलीस निरीक्षकांच्या चिठ्ठीत उघडले रहस्य.

Bybaba maske

Mar 9, 2024

परळी येथे रेल्वे खाली आत्महत्या केलेल्या पोलीस निरीक्षकांच्या चिठ्ठीत उघडले रहस्य.

रोखठोक न्युज प्रतिनीधी

पुणे येथे सीआयडी विभागात कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षकाने रेल्वे खाली येऊन संपवले जीवन; सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागातील अंकले गावचा पहिला पीएसआय – 

 परळी रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या पटरीवरच रेल्वे खाली येऊन पुणे येथे सीआयडी विभागात कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षकाने स्वतःचे जीवन संपवले असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुभाष दुधाळ (वय 42) असं आत्महत्या केलेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वीच दुधाळ यांची बीड येथून पुणे येथील सीआयडी विभागात बदली झाली होती. दरम्यान या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

परळी रेल्वेस्टेशन मास्तर यांनी आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये रेल्वेगाडीखाली एका व्यक्तीचे दोन तुकडे झालेला मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना दिली. यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक परमेश्वर सोगे, पोलीस उपनिरीक्षक साबळे, जमादार बाबासाहेब फड, राजू राठोड, सातपुते व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी परळी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला आहे. मृतदेहाजवळ चिठ्ठी सापडली असून कौटुंबिक करणातून दुधाळ यांनी आपले जीवन संपवल्याची चर्चा आहे. दरम्यान पोलीस तपासातून आत्महत्या की घातपात हे समोर येणार आहे.

सुभाष दुधाळ (वय 42,रा. अंकले ता. जत, जिल्हा सांगली) येथील रहिवासी होते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून सांगली मधील महात्मा गांधी वसतिगृहात शिक्षण घेतले होते. एमपीएससी 2009-10 मध्ये निवड झाल्याची माहिती दुधाळ यांच्या मित्राने दिली आहे. त्यांचे आई वडील हे शेतकरी होते. त्यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी,एक मुलगा,आणि मुलगी तसेच भावाची पत्नी आणि मुले असा परिवार आहे.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!