• Thu. Sep 17th, 2026

खोकल्याचे औषध का देत नाहीस म्हणून उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरच्या गालावर चापट मारली.

Bybaba maske

Mar 9, 2024

खोकल्याचे औषध का देत नाहीस म्हणून उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरच्या गालावर चापट मारली.

 रोखठोक न्युज वार्ताहर 

उपजिल्हा रुग्णालयात अपघात विभाग येथे डॉक्टर बालाजी सुर्याभान नवले ड्युटीवर असताना एक इसम रा.गेवराई त्याने मला सर्दी खोकला झाला असुन मला त्याचे औषध व गोळ्या द्या असे म्हणाला असता आम्ही त्यास रुग्णनोंदणी रजिस्टर नंबर. 1684 अन्वये नोंद घेवुन त्याला विचारपुस करून त्याला सर्दी खोकल्या च्या गोळ्या देण्यात आल्या.

 त्या व्यक्तीने खोकल्याचे औषधाची बाटली मागितली असता आम्ही त्यास सद्या खोकल्याचे औषध अपघात विभागात नाही सकाळी ओ पी डी मधुन घ्या असे म्हणाल्याने त्याने मला तुम्ही तुमची मा… घा…. पण मला खोकल्याचे औषध आणुन द्या असे म्हणुन शिवीगाळ सुरु केली व मी त्यास शिवीगाळ का करतोस असे विचारले असता त्याने माझ्या कानाखाली दोन चापटा मारल्या त्यावेळी त्याला पकडण्यासाठी महेंद्र दत्तात्रय   भिसे (ब्रदर), संतोष रामदास भोटकर (कक्ष सेवक) यांनी त्यास धरून बाजुला केले. त्यानंतर तो शिवीगाळ करत निघुन गेला. 

दिनांक 08.03.2024 रोजी 09.20 वाजताचे सुमारास कर्तव्यावर असताना इसम रा.गेवराई याने मला खोकल्याचे औषधाची बाटली मागितली असता आम्ही त्यास सद्या खोकल्याचे औषध अपघात विभागात नाही असे म्हणाल्याने त्याने मला शिवीगीळ करुन माझ्या कानाखाली दोन चापटा मारुन मी तुला बघुन घेतो असे म्हणून माझे कायदेशिर कर्तव्य पार पाडत असताना मारहाण केली म्हणुन माझी त्याचे विरुध्द कायदेशीर तक्रार करीत आहे.त्या नुसार आरोपी विरोधात गेवराई पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता १८६० ३५३, भारतीय दंड संहिता १८६० ३२३,भारतीय दंड संहिता १८६० ५०४, भारतीय दंड संहिता १८६० ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!