• Thu. Sep 17th, 2026

मुकेश अंबानीच्या वाढदिवस व अंनत अंबानीच लग्न आल अंगलट मोबाईल रिचार्जच्या ऑफरने अनेकांचे बँक खाते रिकामे.

Bybaba maske

Mar 10, 2024

मुकेश अंबानीच्या वाढदिवस व अंनत अंबानीच लग्न आल अंगलट मोबाईल रिचार्जच्या ऑफरने अनेकांचे बँक खाते रिकामे.

रोखठोक न्युज वार्ताहर 

मोबाईल स्टेट बँक खातेदारांचे खाते रिकामे झाल्याचे रिचार्ज ऑफरने व बँकेचे ७ हजार रुपये मिळण्याच्या लालसेपोटी सायबर गुन्हेगारांनी नवीन फंडा तयार करत बँक खातेदारांचे खाते हॅक करून ऐन सुट्टी च्या दिवसांत अनेकांचे बँक खाते रिकामे झाल्याचे प्रकार दोन दिवसांपासून वडीगोद्री परिसरात घडत आहेत. यातील आंतरवाली व वडीगोद्री येथील एसबीआयच्या ग्राहकांना चुना लावला आहे. वारंवार सर्वच बँक करताना सतर्कता बाळगावी, फसव्या मेसेज व लिंकवर विश्वास ठेवू नये, आलेल्या मेसेजची खात्री करावी, कोणतेही पेमेंट करताना सावध रहा आणि पेमेंट विनंतीची सत्यता पडताळून पहा. कृपया अनोळखी नंबरवरून व्हॉट्सअॅप, यूपीआयडी, क्युआर कोड, ई-मेल किंवा फसवे कॉल्स इत्यादीद्वारे प्राप्त झालेल्या विनंतीसाठी कोणतेही पेमेंट करू नका. या माध्यमातून जनजागृती करण्यात येत असते. सायबर खात्याकडून वारंवार सूचना देण्यात येत असली तरी अनेक जण याकडे दुर्लक्ष करतात यातूनच अनेक जिओ सिमधारक व भारतीय नागरिक या लिंक मुळे हजारो नागरिकांना गंडा बसला.

या आठवड्यात हॅकरने जिओ ऑफर : नीता अंबानी आणि मुकेश अंबानी त्यांच्या सर्व जिओ ग्राहकांना त्यांच्या मुलगा अनंत अंबानीच्या लग्नाच्या निमित्ताने २५९ रुपयांचे ३० दिवस मोफत तर ८४ दिवसांसाठी ५५५ रुपयांचा रिचार्ज देत आहेत आणि ही ऑफर बंद होऊ शकते. पुढील ३ दिवसांत. आता लिंकवर क्लिक करा आणि लाभ घ्या, असा मेसेज तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करून त्यामध्ये निळ्या रंगाची फेक लिंक येत आहे. तुम्ही त्या लिंकला क्लिक केल्यास तुमचा मोबाईल नंबर टाका असे ऑप्शन येते आणि नंतर ओटीपी येतो टाकल्याने बँक खात्यामधले पैसे गायब होण्याचे प्रकार घडले आहेत. फसवी लिंक तयार करून बँक खाते रिकामे करण्यासाठी सोशल मीडियावर

व्हायरल केली. लोकांनी या लिंकची शहानिशा न करता एका ग्रुपवरुन, दुसऱ्या ग्रुपवर मेसेज टाकत गेले. रिचार्जसाठी ती लिंक ओपन केली असता रिचार्ज तर आले नाही अनेकांचे बँक खाते रिकामे झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. जिओ रिचार्ज ट्रेडिंगचा फंडा जास्त काळ चालला नसल्याने सायबर गुन्हेगारांनी दुसरी शक्कल लढवून एसबीआय योनोच्या नावाखाली बनावट लिंक भारतीय स्टेट बँकेच्या नावाने ऍ६.२.९५. अॅप डाऊनलोड अशी फेक लिंक तयार करून ‘प्रिय एसबीआय योनो ग्राहक आज तुमच्या बॅलेन्स ६ हजार ९९९ किमतीच्या एसबीआय रिवॉर्ड पॉइंट्सवर दावा करण्याची शेवटची संधी तुमच्या रिवॉर्ड पॉइंट्सचा दावा रोख स्वरूपात करण्यासाठी एसबीआय अॅप इन्स्टॉल करा. धन्यवाद

भारतीय स्टेट बँक नावाने बनावट योनो लिंक व्हायरल होत असल्याची कर्मचाऱ्यांना कुठलीही माहिती नाही. काल रात्री वडीगोद्री शाखा व्यवस्थापक मोहित कुमार यांना माहिती देण्यात आल्यावर वरिष्ठांना ही माहिती दिली. विशेष म्हणजे बँकला ३ दिवस सुट्टी आहे. या संधीचा फायदा सायबर गुन्हेगारांनी घेतला आहे. आंतरवाली सराटी येथील रामप्रसाद तारख यांच्या खात्यातून ३ हजार ८०० रुपये गायब झाले आहेत. त्यांनी ऑनलाईन तक्रार सायबर खात्याकडे नोंदवल्याचे सांगितले. या माध्यातून अनेक भारतीय स्टेट बँक खातेदारांना गंडा बसला असून, समोर येऊन सांगायाला कोणीही तयार नाही. दोन्ही प्रकार घडल्यानंतर बाकीच्या बँकां ग्राहकांना सावधान करत असल्याचे दिसून येते.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!