• Thu. Sep 17th, 2026

मोबाइल चार्जर समजून डिटोनेटर लावले चार्जिंगला, चार बोटे तुटले.

Bybaba maske

Mar 10, 2024

मोबाइल चार्जर समजून डिटोनेटर लावले चार्जिंगला, चार बोटे तुटले.

रोखठोक न्युज वार्ताहर 

घरासमोर सापडलेल्या डिटोनेटरला मोबाईल चार्जर समजून पोलीस भरतीचा अभ्यास करणाऱ्या तरुणाने ते स्टॅबलायजरला जोडले असता मोठा स्फोट होऊन त्यात तरुणाच्या हाताच्या अंगठ्यासह तीन बोटे तुटून तो गंभीर जखमी झाला. हि खळबळजनक घटना बीड तालुक्यातील कचरवाडी येथे शुक्रवारी (दि.०८) रात्री घडली.

कृष्णा उर्फ राजेंद्र नामदेव वणवे (वय २५, रा. कचरवाडी) असे त्या जखमी तरुणाचे नाव आहे. कृष्णा सध्या गावालगत असलेल्या गोठ्यामध्ये थांबून पोलीस भरतीचा अभ्यास करत असतो. मंगवारी (दि.०५) त्याच्या आईला घरासमोर चार्जर सदृश्य वस्तू सापडली होती. वास्तवात चार्जर समजून कृष्णाची आई घरात घेऊन आलेली ती वस्तू डिटोनेटर होती. घरात इतर चार्जर असल्याने दोन दिवस त्याकडे कोणाचे लक्ष गेले नाही. मात्र, शुक्रवारी ते डिटोनेटर घेऊन रात्री कृष्णा गोठ्यात अभ्यासासाठी गेला. रात्री १० वाजताच्या सुमारास कृष्णाने चार्जर समजून ते डिटोनेटर स्टॅबलायजरला जोडताच मोठा स्फोट झाला. या स्फोटात त्याच्या हाताचा अंगठा आणि दोन बोटे तुटून उडाली आणि हाताला मोठी दुखापत झाली. जखमी कृष्णाला ग्रामस्थांनी बीडच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी कृष्णाच्या फिर्यादीवरून घरासमोर डिटोनेटर टाकणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर बारीपदार्थ अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहा. पोलीस निरिक्षक चंद्रकांत गोसावी करत आहेत.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!