• Thu. Sep 17th, 2026

ट्रॅक्टर ट्रकचा भीषण अपघात, ट्रक चालक जागीच ठार. मृतदेह बाहेर काढण्यासाठी तीन तास वेळ लागला,,!

Bybaba maske

Mar 11, 2024

ट्रॅक्टर ट्रकचा भीषण अपघात, ट्रक चालक जागीच ठार.

मृतदेह बाहेर काढण्यासाठी तीन तास वेळ लागला,,!

रोखठोक न्युज वार्ताहर 

मृतदेह बाहेर काढण्यासाठी तीन तास वेळ लागला,,!

भंगार ने भरलेल्या ट्रक च्या कॅबीन चा चुराडा.

ट्रॅक्टर-ट्रक च्या समोरासमोर झालेल्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री पालखी महामार्गावरील माजलगाव तेलगाव दरम्यान टालेवाडी फाट्यावर घडली.हा अपघात इतका भिषण होता की, उसाने भरलेल्या ट्रॅक्टर च्या हेडने भंगार भरलेल्या ट्रक च्या कॅबीनचा चुराडा केला आहे.

तेलगाव कडे जाणारया उसाच्या ट्रॅक्टरला जालना कडे जाणाऱ्या भंगार भरलेल्या ट्रकने रॉंग साईड येत समोरासमोर भिषण धडक दिली.बिथरलेल्या ट्रॅक्टर चालकाने प्रसंगावधान राखत ट्रॅक्टर रस्त्याखाली घेण्याचा प्रयत्न केला मात्र हेडने ट्रकच्या कॅबीनचा चुराडा झाला.या घटनेत ट्रक चालक सय्यद इरफाश अहमद (वय 40 वर्षे) रा. जुना जालना जागीच ठार झाला आहे. घटनास्थळी दिंद्रुड पोलिसांनी धाव घेत मृतास माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. 

दिंद्रुड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धोत्रे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल भालेराव व पोलीस नाईक बालाजी सुरेवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना क्रेनच्या साह्याने ट्रक व ट्रॅक्टर वेगळे करून मृतदेह बाहेर काढण्यासाठी तब्बल तीन तास वेळ लागला. चुराडा,,,!

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!