• Thu. Sep 17th, 2026

*वंचित बहुजन युवा आघाडी परळी तालुक्याच्या वतीने प्रबुद्ध भारत सभासद नोंदणी अभियानास सुरुवात.*

Bybaba maske

Mar 11, 2024

वंचित बहुजन युवा आघाडी परळी तालुक्याच्या वतीने प्रबुद्ध भारत सभासद नोंदणी अभियानास सुरुवात.

       

रोखठोक न्युज वार्ताहर 

वंचित बहुजन युवा आघाडी परळी च्या वतीने प्रबुद्ध भारत पाक्षिकाचे घर तिथे प्रबुद्ध भारत अंतर्गत प्रबुद्ध भारत सभासद नोंदणी अभियान वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेंद्र भैय्या कांबळे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली आज परळी येथे झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष राजेश सरवदे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रजावती ताई कांबळे, शहराध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा हनुमंत वाघमारे सर, तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा विलास रोडे सर,स्वप्निल कांबळे डिव्हिजनल ऑफिसर, समता सैनिक दल इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक वंचित बहुजन युवा आघाडीचे युवा नेते देवानंद गायकवाड यांनी केले. तसेच प्रबुद्ध भारत बहुजन चळवळीसाठी किती आवश्यक आहे.आणि प्रबुद्ध भारत काळाची का गरज आहे प्रबुद्ध भारत या पक्षाचे वर्गणीदार व सभासद होणे किती महत्त्वाचे आहे यावर विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रबुद्ध भारत सभासद नोंदणी अभियान हे 10 मार्च ते दहा मे या कालावधीत परळी तालुक्यातील संपूर्ण गावांमध्ये राबविण्यात येणार असून प्रत्येक गावामध्ये प्रबुद्ध भारत चे वाचक व सभासद जास्तीत जास्त करण्याचा संकल्प यावेळी युवा आघाडीच्या माध्यमातून करण्यात आला सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंचित बहुजन व आघाडीचे शहराध्यक्ष प्रेम जगतकर यांनी केले व आभार प्रदर्शन जोंधळे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन युवाआघाडीचे सर्व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!