• Thu. Sep 17th, 2026

शहराचा आरसा समजणार्‍या बस स्टॅंड समोर कचऱ्याचा ढीग. नगरपंचायत स्वच्छतेत किती गंभीर?

Bybaba maske

Mar 12, 2024

शहराचा आरसा समजणार्‍या बस स्टॅंड समोर कचऱ्याचा ढीग.

नगरपंचायत स्वच्छतेत किती गंभीर?

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज शहरातील बस स्टॅंड समोर खाजगी गाडीची वहातुक होते,तिथून खेडेगावात,अंबाजोगाई परळी येथे जाण्या साठी मोठी वरदळ असते.एस टी बस भेटत नसेल तर प्रवाशी येथे खाजगी वाहनाची प्रतिक्षा करत असतात तसेच हा खेडेगावात जाणाऱ्या धारूर,कुबेफळ चंदनसावरगाव,होळ ,अंबाजोगाई येथून खाजगी वहाने जातात अश्या वर्दळीच्या ठिकाणी प्रचंड कचरा साठला आसुन त्यात भयंकर दुर्गंधी पसरली आहे पण ना विलाजास्तव येथे चाकरमान्यांना नाक दाबून गाडीची वाट बघत थांबावे लागते.इथल्या दुर्गंधी युक्त कचऱ्या मुळे मोकाट कुत्रे, डुक्करे तिथे हमेशा असतात त्यामुळे चाकरमान्या मध्ये व लहान मुले, महिला मध्ये प्रचंड भिती असते.जीव मुठीत घेऊन येथे थांबावे लागते आजु बाजुचे चिकन,मटण वाले येथेच सगळी घाण टाकत असतात.बस स्टॅंड हा शहराचा आरसा असतो.त्याच्या आजूबाजूच्या स्वच्छते वर शहराचा विकास ठरवला जातो त्या बस स्टॅंड समोर व राष्ट्रीय महामार्गावर अशी घाण केजकरांची इज्जत घालवत आहे आणि केज नगरपंचायत डोळे बंद करून शहरातील नागरिकांची सहनशीलतेची परिक्षा घेत असल्याच दिसून येत आहे.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!