• Thu. Sep 17th, 2026

शहरातून १६ वर्षीय मुलाचे अपहरण रोखठोक न्युज वार्ताहर 

Bybaba maske

Mar 12, 2024

शहरातून १६ वर्षीय मुलाचे अपहरण

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज शहरातून १६ वर्षीय मुलाचे अज्ञात आरोपींनी अपहरण केले. याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यापारी उमेश अंधारे धारूर रोड परिसरात राहतात. बुधवारी सकाळी ११ वाजता त्यांचा मुलगा मयंक घरासमोर खेळत असताना अज्ञात आरोपींनी त्याने अपहरण केले. नातेवाइकांकडे त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. त्यामुळे उमेश अंधारे यांनी रविवारी ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला. पोनि प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेश पाटील करीत आहेत.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!