• Thu. Sep 17th, 2026

एक लाखाचा गुटखा पकडला आरोपी ताब्यात. एएसपी कमलेश मीणा व त्यांच्या पथकाची कारवाई.  

Bybaba maske

Mar 12, 2024

एक लाखाचा गुटखा पकडला आरोपी ताब्यात.

एएसपी कमलेश मीणा व त्यांच्या पथकाची कारवाई.

रोखठोक न्युज वार्ताहर 

नांदुरघाट ता. केज जि.बीड येथे महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत गुटख्याची बेकायदेशिर चोरटी विक्री करनाऱ्यावर छापा टाकुन 112,272/- रुपयेचा मुददेमाल जप्त करुन एक आरोपी ताब्यात घेतला.

आज दिनांक 12.03.2024 रोजी मा. कमलेश मीना, सहा. पोलीस अधीक्षक, उपविभाग केज यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, इसम नामे नाव महेश रमेश तारळकर, वय-34 वर्ष, रा. नांदुर ता. केज जि. बीड हा स्वतःचे आर्थीक फायदयासाठी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा किरायाने गोडाऊन करुन त्यामध्ये ठेवुन सदर प्रतिबंधीत गुटख्याची बेकायदेशिर चोरटी विक्री करित आहे. अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने सहा. पोलीस अधीक्षक, श्री. कमलेश मीना साहेब यांनी पोउपनि नेमणुक, पोलीस ठाणे केज, पोलीस नाईक दिलीप गित्ते, पोलीस अंमलदार शमीम पाश यांना सदर बातमीचे ठिकाणी जावुन छापा मारण्याचे आदेश दिल्याने नमुद अधिकारी व कर्मचारी यांनी बातमीचे ठिकाणी जावुन 12.40 वाजण्याचे सुमारास छापा मारला असता सदर ठिकाणी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेले 112,272/- रुपये (एक लाख दोन हजार दोनशे बहात्तर रुपये) रुपयाचा मुद्देमाल मिळुन आला तो पो. उप.नि. शिंदे यांनी जप्त केला. व आरोपी महेश रमेश तारळकर, वय-34 वर्ष, रा. नांदूर ता. केज जि.बीड यास ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस नाईक दिलीप गित्ते यांचे फिर्यादीवरुन आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई  नंदकुमार ठाकुर, पोलीस अधिक्षक बीड,  चेतना तिडके , अपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई यांचे मार्गदर्शनाखाली व कमलेश मीना, सहा. पोलीस अधिक्षक, बीड यांचे आदेशाने पोलीस उपनिरीक्षक आंनद शिंदे, पोलीस नाईक दिलीप गित्ते, पोलीस अंमलदार शमीम पाशा यांचे पथकाने केली आहे.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!