अतिक्रमण धारकाची मुजोरी राज्य महामार्गावरील नाली तोडून गाळा बनवतोय.
एचपीएम,फलोत्पादन,नगरपंचायत ला कुठलेच गांभीर्य नाही.
सरकारी मालमत्तेच नुकसान करणाऱ्यांस कोणाच अभय?
रोखठोक न्युज वार्ताहर
केज शहरातील राज्य महामार्गावरील अतिक्रमण आता पहिल्या सारखेच पुन्हा बसू लागले आहे.केज तहसीलदार अभिजीत जगताप पोलीस उपधिक्षक पंकज कुमावत असताना प्रशासनाने मोठ्या मेहनतीने अतिक्रमण मुक्त केज केले होते. पण पुन्हा प्रशासनाच्या नाकावर टिच्चून अतिक्रमण पुर्ण राज्य रस्त्यावर होत आहे. अतिक्रमण होतच नसून जी जागा फलोत्पादनाची असताना 100 ते 150 फुट जागा ताब्यात घेऊन पत्र्याचे गाळे बांधले जात आहे पून्हा शहर विद्रूपीकरण चालु झाले आहे.
यात कहर म्हणजे तांबोळी नावांच्या महाशयांनी एचपीएम कंपनीकडून रस्त्यालगत जी लाखो रूपये खर्चून नाली बनवली आहे ती तोडून टाकली आहे व आपला गाळा तयार करत आहे या तांबोळी नावाच्या व्यक्तीस कोणाचा राजकीय वरदहस्त आहे. फोटोत दिसत असल्या प्रमाणे विट्टाची गाडी त्यावर चढवून नालीचा पुर्ण छत तोडले आहे.यावर एचपीएम कंपनी गप्पगार आहे.खरेतर मालमत्तेच नुकसान म्हणून एचपीएम कंपनीकडून किंवा फलोत्पादन च्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या जागेत होत असलेल्या कब्जा मुळे कारवाई करणे अपेक्षित असताना हे सगळ होत आहे.यात नगरपंचायत,तहसील, बांधकाम विभागा,फलोत्पादन विभाग,पोलीस प्रशासनाकडून यावर त्वरित कारवाई ची गरज आहे कारण अश्या कुठल्याही अवैध बांधकामास प्रशासन कडून लक्ष देणे गरजेच असत पण तसे होताना दिसत नाही.यात नगरपंचायत चा महसूल बुडतो व शहरातील जनतेचे विकास कामे होत नाहीत.तरी अतिक्रमणांवर तात्काळ कारवाई व्हावी अशी केज च्या नागरिकात बोलले जात आहे.
