• Sat. Sep 19th, 2026

पोलवरिल विद्युत तार निखळून पडली महिला जागीच ठार.

Bybaba maske

Jul 17, 2024

पोलवरिल विद्युत तार निखळून पडली महिला जागीच ठार.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज – शेतातील पोलवरील विद्युत तारा वाऱ्याने एकमेकांना चिटकून स्पार्किंग होऊन विद्युत तार निसटून खाली आल्याने खुरपणी करीत असलेल्या एका ४५ वर्षीय महिलेला शॉक बसल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना मानेवाडी (ता. केज) येथे बुधवारी (दि. १७) दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडली.

मानेवाडी (ता. केज) येथील विमल बाबुराव माने (वय ४५) या बुधवारी शेतात कापूस पिकात खुरपणी करीत होत्या. दुपारी २.३० वाजेच्या सुमारास वाऱ्याने पोलवरील विद्युत तारा एकमेकांना चिकटून स्पार्किंग झाल्याने एक विद्युत तार पोलवरील चिनीमातीच्या मन्यातून निसटून खाली येत लोंबकळली.

याचवेळी खुरपणी करीत असलेल्या विमल माने या उठून पुढे सरकत असताना लोंबलेली विद्युत तार त्यांच्या गळ्याला लागून गळा भाजला आणि जोराचा शॉक बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या आदेशावरून फौजदार बसवेश्वर चनशेट्टी, फौजदार राहुल पतंगे, सहाय्यक फौजदार रमेश सिरसाट यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या शवगृहात मृतदेह ठेवण्यात आला असून गुरुवारी शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक फौजदार रमेश सिरसाट यांनी दिली. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असून घटनेबद्दल गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!