• Sat. Sep 19th, 2026

एटीएम फोडताना चोरास पोलिसांनी रात्री २ च्या सुमारास अटक केली.

Bybaba maske

Jul 19, 2024

एटीएम फोडताना चोरास पोलिसांनी रात्री २ च्या सुमारास अटक केली.

रोखठोक न्युज वार्ताहर

बीड-शहरातील बार्शी रोडवरील शिवसेना कार्यालयाच्या बाजूला असणाऱ्या ऐक्सिस बँकेचे एटीएम फोडताना एका चोरट्याला शिवाजीनगर पोलिसांनी रात्री २ च्या सुमारास अटक केली आहे.

अक्षय दिलीप गायकवाड (वय-२५ रा. पेंडगाव) असे त्या आरोपीचे नाव आहे. पहाटे २ च्या सुमारास अक्षय बार्शी रोडवर असणाऱ्या ऐक्सिस बँकेच्या एटीएममध्ये दगडाने मशीन फोडून कॅश काढण्याचा प्रयत्न करत होता. रात्री पेट्रोलिंग करणाऱ्या शिवाजीनगर पोलिसांना एटीएममध्ये संशयास्पद हालचाली दिसल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून एटीएममधील पैसे मात्र सुरक्षित असल्याचे कळते.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!