• Wed. Nov 25th, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) केज शहराध्यक्षपदी शद्दु खतीब यांची निवड

Bybaba maske

Sep 14, 2024

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) केज शहराध्यक्षपदी शद्दु खतीब यांची निवड

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) केज शहर अध्यक्ष पदी सद्दाम (शद्दु) खतीब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मा.खासदार बजरंग बाप्पा सोनावणे यांनी त्यांची निवड केली अंबाजोगाई येथे कार्यकर्ता मेळाव्यामध्ये माजी आमदार पृथ्वीराज साठे, ज्येष्ठ नेते बबन जाधव राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष शंकर जाधव, केज न.प चे गट नेते भाऊसाहेब गुंड, गुलाब पठाण यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये शद्दु खतीब यांना निवडीचे पत्र देऊन अभिनंदन करण्यात आले. मा.खासदार बजरंग बाप्पा यांच्याशी एकनिष्ठता आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधला जनसंपर्क यामुळे त्यांच्यावर आता शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बजरंग बप्पा सोनवणे प्रतिष्ठान, छत्रपती अंगरक्षक इब्राहिम खान प्रतिष्ठान व अल सफा वेल्फेअर सोसायटी च्या माध्यमातून सामाजिक, संस्कृति व क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय असे काम केलेले आहेत. आगामी काळात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि अधिकाधिकी तरुणांना राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सद्दाम (शद्दु) खतीब यांनी सांगितले. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या विचार धारेशी एकरूप राहून माननीय खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांना आदर्श स्थानी मानून पक्ष श्रेष्ठींनी ठेवलेला विश्वास सार्थ ठरवून दाखवेल असं देखील सद्दाम (शद्दु) खतीब यांनी यावेळी म्हंटले.

baba maske

Related Post

केज शहराला लॉजचा विळखा! परवान्यांचा हिशेब कुठे? अवैध धंद्यांच्या संशयाने नागरिक संतप्त! अल्पवयीन मुला-मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न; लॉजची दिवसा-रात्री अचानक झडती घेण्याची मागणी
केजकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर! दुष्काळात केजकरांच्या पाण्यासाठी लोकप्रतिनिधींची बेफिकिरी! ना आमदारांची बैठक, ना नगराध्यक्षांचा पुढाकार; पाण्यासाठी नागरिकांची वणवण दुष्काळ जाहीर होऊन महिना उलटला, ना आमदारांची बैठक, ना नगराध्यक्षांचा पुढाकार; केजकरांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ!
मन्मथ स्वामींच्या दिंडीत भरधाव ट्रक घुसला! महिला भाविक जखमी; मस्साजोग येथे संतप्त भाविकांचा रास्ता रोको

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!