• Sat. Sep 19th, 2026

तहसीलदाराच्या पत्नीच्या 1 लाख 41 हजार 700 केज बसस्थानकातून लंपास. 

Bybaba maske

Sep 15, 2024

तहसीलदाराच्या पत्नीच्या 1 लाख 41 हजार 700 केज बसस्थानकातून लंपास. 

रोखठोक न्युज वार्ताहर 

बसमध्ये चढत असलेल्या खुलताबादच्या तहसीलदारांच्या पत्नीने पर्स मध्ये ठेवलेले पाच तोळे वजनाचे सोन्याची दागिने चोरट्यांनी पळवल्याची खबळजनक घटना केज बस स्थानकात घडली आहे.

या बाबत मिळालेली माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी स्वरूप कंकाळ यांची पत्नी मयुरी कंकाळ या त्यांच्या दोन मुलांसह सासरी धारूर येथे गौरी-गणपतीच्या सणा निमित्त आल्या होत्या. सण संपल्या नंतर दि. 13 सप्टेंबर शनिवार रोजी सायंकाळी 5:15 वाजण्याच्या सुमारास त्या केज येथील बस स्टँड वरून संभाजीनगरकडे जाणाऱ्या बस मध्ये चढत असताना चोरीची घटना घडली. त्यांच्या सोबतच्या मोठ्या पर्स मधील एका लहान पर्स मध्ये ठेवलेले पाच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण व नगदी 1700 रू. असे एकूण 1 लाख 41 हजार 700 रु. किमतीचे दागिने व रोकड हे अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. सदर दागिन्यांची आजची किंमत जवळजवळ 3 लाख 70 हजार रुपये होते.

या प्रकरणी तहसीलदार स्वरूप कंकाळ यांची पत्नी मयुरी कंकाळ यांच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. 498/2024 भा. न्या. सं. 303(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केज पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार त्रिंबक सोपने हे पुढील तपास करीत आहेत.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!