• Sat. Sep 19th, 2026

सुरेश कुटे यांच्या तिरुमलाच्या सुरक्षा रक्षकाकडून ज्ञानराधाच्या खातेधारकांवर गोळीबार.

Bybaba maske

Sep 17, 2024

सुरेश कुटे यांच्या तिरुमलाच्या सुरक्षा रक्षकाकडून ज्ञानराधाच्या खातेधारकांवर गोळीबार.

रोखठोक न्युज वार्ताहर 

सुरेश कुटे यांची तिरुमाला कंपनी सुरू आहे की, बंद हे पाहण्यासाठी आलेल्या वैजापूर तालुक्यातील ‘ज्ञानराधा’च्या खातेधारकांवर कंपनीच्या सुरक्षारक्षकाने छऱ्यांच्या रायफल (डबल बोर) मधून गोळीबार केला. यामध्ये डोक्याला छरें लागून एक खातेदार जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर मार्गावर असलेल्या ढोरेगाव शिवारातील तिरुमाला कंपनीच्या प्रवेशद्वारावर घडली. याप्रकरणी एकमेकांच्या विरोधी फिर्यादीवरून सहा जणांच्या विरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील वैजापूर काही खातेधारकांनी सुरेश कुटे यांच्या ज्ञानराधा मल्टिस्टेट वैजापूर

 शाखेत लाखोंची गुंतवणूक केली आहे. मात्र, मल्टिस्टेट बंद पडल्याने या ठेवीदारांचे पैसे मिळण्याची शक्यता नसल्याने यापैकी पाच खातेधारक हे सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास गंगापूर तालुक्यातील छत्रपती श्री संभाजीनगर-अहमदनगर मार्गावर 15 ढोरेगाव शिवारात असलेली कुटे यांची तिरूमला कंपनी सुरू आहे की नाही, हे पाहण्यासाठी 5 पोहोचले. त्यानंतर ‘आम्हाला कंपनीत प्रवेश द्या’ अशी मागणी 5 ते सुरक्षा रक्षकाकडे करत होते. यादरम्यान तेथे कंपनीद्वारे नियुक्त शौर्य एजन्सीच्या योगेश बबन तनकुरें (डबल बोर परवाना धारक सेवानिवृत्त सैनिक (वय ४०, रा. आखेगाव, ता, शेवगाव, जि. अहमदनगर) या सुरक्षा रक्षकाने त्याच्याजवळील छर्रा बंदुकीने गोळीबार केला. त्यात शिवनाथ देविदास आहेर (३३,

गोळीबारात जखमी झालेला ज्ञानराधाचा खातेधारक.रा. नगिना पिंपळगाव, ता. वैजापूर) यांच्या डोक्याला व हातांला छर्रा चाटून गेल्याने ते जखमी झाले. त्यांच्या सोबतच्या इतर सहकाऱ्यांनी आहेर यांना जखमी अवस्थेत येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी जखमी शिवनाथ आहेर यांच्या फिर्यादीवरून कंपनीचा सुरक्षा रक्षक योगेश बबन तनकुरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरक्षा रक्षकानेही दिली फिर्याद

या घटनेतील आरोपी सुरक्षारक्षक तनकुरे यांनीही पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल अशोक देवरें (वय ३१, रा. लक्ष्मीनारायणनगर, वैजापूर), पुष्पेंद्र कृष्णदास बापते (४३, नवजीवन कॉलनी, वैजापूर), ज्ञानेश्वर श्रीराम गायके (३२, रा. भिवगाव, ता. वैजापूर), योगेश सुभाष गायकवाड (३५, रा. गायकवाडवाडी, वैजापूर) यांच्या विरोधात सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणे व खासगी मालमत्तेत जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न केला, म्हणून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत गंगापूर पोलिस ठाण्यात सुरू होती.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!