• Wed. Jun 3rd, 2026

केज शहरात शाळकरी मुलाचे अपहरण करणार्‍यांस नागरिकांनी पकडले व चोप दिला. तिघे फरार, चौघांविरुद्ध गुन्हा अजून पंर्यत पोलीसांचा खुलासा नाही किंवा पत्रकार परिषदे नाही?

Bybaba maske

Sep 24, 2024

केज शहरात शाळकरी मुलाचे अपहरण करणार्‍यांस नागरिकांनी पकडले व चोप दिला. तिघे फरार, चौघांविरुद्ध गुन्हा

अजून पंर्यत पोलीसांचा खुलासा नाही किंवा पत्रकार परिषदे नाही?

रोखठोक न्युज वार्ताहर 

आजच्या घटनेनंतर शहरात उलटसुलट चर्चा ऐकावयास मिळत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एवढ्या मोठ्या घटनेनंतर देखील पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली नाही.त्यामुळे शहरातील व पंचक्रोशीतील नागरिक परेशान आहेत.काही विद्यार्थी खेड्यातून शहरात शिकण्या साठी येतात.आरोपी काल पासुन अटक असताना ही पोलीसांकडून कुठलाच खुलासा न झाल्याने पालक चिंतेत आहेत. 

केज केज शहरातील एका पाचवीच्या मुलास चॉकलेटचे आमिष दाखवून पाठलाग करीत मागील चार दिवसांपासून अपहरण करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या एकास नातेवाईक व नागरिकांनी चांगला चोप दिल्याची घटना सोमवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली. तर तिघे जण फरार झाले असून नागरिकांनी एका कारची तोडफोड केली. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

केज शहरातील भीमनगर भागातील परमेश्वर नारायणराव मस्के हे मिस्त्री काम करीत असून त्यांना दोन मुले व दोन मुली अशी चार अपत्य आहेत. त्यांचा एक मुलगा अंकुर मस्के (वय ११) हा धारूर रस्त्यावरील रामराव पाटील विद्यालयात इयत्ता ५ वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. १४ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास अंकुर याने घरी येऊन आपल्या आईला एका कारमधून दोन माणसे माझा शाळेत जाताना पाठलाग करीत असून दाढी असलेला चॉकलेट देतो, तु माझ्या सोबत गाडी मध्ये बस असे म्हणाला होता. त्यानंतर २१ सप्टेंबर रोजी दुचाकीवरून पुर्ण दाढी व गळ्यात रूद्राक्षाची माळ असलेला व भिक्षा मागण्याचे पिवळ्या रंगाचे पात्र असलेल्या इसमाने अंकुरचा मंगळवार पेठपासून पाठलाग करीत धारूर चौकापर्यंत गेला. अंकुरने हाच माणुस माझा वारंवार पाठलाग करत असल्याचे सांगितल्यानंतर त्याच्या सोबतच्या शाळेच्या मुलांनी हातात दगड घेतल्याने तो तेथून दुचाकीवरून पळून गेला. या प्रकाराने घाबरूनगेल्यामुळे २३ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता अंकुर याचा पाठलाग कोण करतंय हे पाहण्यासाठी परमेश्वर मस्के त्यांचा भाचा प्रबुध्द अतंम बनसोडे व बहिणसुनीता गणपत कांबळे यांना सोबत घेऊन अंकुरला पुढे शाळेत पाठवून त्याच्या पाठीमागे येत होते. अंकुर हा मंगळवार पेठ कॉर्नरला आला असता त्याला त्याचा पाठलाग करणारी निळ्या रंगाची कार ही मुख्य रस्त्यावर मच्छी मार्कटसमोर दिसून आली. त्याने ही कार असल्याचे सांगितले. याचवेळी बाजूच्या टपरीच्या पाठीमागे उभे असलेल्या दोन इसमांपैकी चॉकलेट देतो म्हणणाऱ्या एका दाढीवाला इसमाने व कारमधील दुसरा दाढीवाल्या इसमाने माणसाने अंकुर याला कारमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. याचवेळी नातेवाईकांनी अपहरणकर्त्यांपैकी विजय गोपीनाथ भंडारी (रा. सणसर ता. इंदापुर जि. पुणे) यास पकडले. तर दोघे जण जिरायत खात्याच्या जमिनीतून पळुन गेले. तर कारमध्ये बसलेला इसम ही गर्दीचा फायदा घेत पळून गेला. त्याचे नाव धनराज वळसे (रा. केज) असे असून उभी असलेली कार (एम. एच. १२ एच. व्ही. ७०९९) ही त्याची असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारामुळे चिडलेल्या नागरिकांनी पकडलेल्या विजय भंडारी याची चांगली धुलाई करीत ठाण्याकडे घेऊन आले. यावेळी नागरिकांनी घटनास्थळी उभी असलेली कार (एम. एच ४२ बी. ई. ०७८८) उलढून टाकून मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली.

दरम्यान, परमेश्वर मस्के यांनी दिलेल्या तक्रारीवरून धनराज वळसे, विजय भंडारी व इतर अनोळखी दोघे अशा चौघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनात फौजदार राजेश पाटील हे तपास करीत आहेत. पोलिसांनी दोन्ही कार जप्त केल्या आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!