केज मतरसंघात दिवे लावायचे स्वप्न बघणार्यानो केज चे पथदिवे लावा?
केज संघर्ष समितीला ही ठेवले अंधारात?
रोखठोक न्युज वार्ताहर
एचपीएम कंपनीकडून नगरपंचायत कडे केजच्या मुख्य रस्त्यावरचे पथदिवे केज नगरपंचायत कडे दोन वर्षांपासून हस्तांतरीत झाले आहेत पण ते चालु करण्या साठी अश्वासनाच्या खैरती शिवाय केजकरांच्या हाथी काही लागले नाही.गेल्या अडीच वर्षांपासून विकासाच्या नावाने शिमगा आहे पण सत्ताधारी न झालेला किंवा कोठे तरी वार्डात फूटभर झालेल्या विकासावरच आपले घोडे न्हाऊन काढत असतात बडे बडे बाता विकास मात्र शुन्य!
इऊ करूगां..तिव करूगां याच्या पुढे विकास काही गेला नाही.सगळा विकास नगरोत्थान योजनेंतर्गत झालेल्या व नगरपंचायतने दिलेल्या नाहरकत माणपत्रा शिवाय काही नाही. 3 कोटी 50 लाखाचा दलित निधी अन्यत्र वळवळवल त्या साठी उद्या दिनांक 24 सप्टेंबर पासुन दलित युवकांचे उपोषण आहे.फुलेनगर मधील जिथे दलित वस्ती नाही तिधे रोड नाली बनवली तेही आपल्या सगे सोयरा च्या प्लांटीग साठी.
गेल्या आठवडय़ात केज संघर्ष समितीने सणासुदीचा काळ आहे,गणपती,नवरात्र असे सण असल्या कारणाने केज शहरातील पथदिवे चालू करावेत या साठी अंदोलन पुकारले होते या अगोदर सुद्धा अंदोलन पूकारले पण अश्वासनावर नगरपंचायतने बोळवण केली होती.पण या वेळेस डिपी उभारून सर्व मान्यवर व केज संघर्ष समितीचे हनुमंत भोसले यांना सोबत घेऊन पथदिव्याचे उद्घाटन केले पण दुपारी उद्घाटन केले आणि रात्री पथदिवे बंदच राहीले ते अजतागायत बंद आहे.उद्घाटनाच्या दिवशी त्याच राणाभीमदेयी घोषणा, पत्रकार, अंदोलन करते समाज सेवक यांना टुमने पर भाषणे आणि संध्याकाळी नगराध्यक्ष व सर्वेसर्वा यांचे पोकळ विकास केज शहरातील नागरिका समोर.केजच्या नगराध्यक्ष व त्यांचे पक्षाचे सर्वेसर्वा केज मतरसंघातून आमदारकीचे स्वप्न पडत आहेत त्याना अडीच वर्षांत केजचा विकास करता आला नाही, सकाळी उद्घाटन केलेले पथदिवे रात्री चालू होत नसतील शहरातील जनतेला अंधारात चाचपडत लागावे लागत असेल तर याला काय म्हणायचे.म्हणून केजची जनता म्हणते आगोदर केजचे पथदिवे लावा त्यानंतर केज मतरसंघात दिवे लावा.
आता या नंतर केज संघर्ष समितीच्या हनुमंत भोसले यांनी मागे घेतलेल्या अंदोलन व न लागलेले पथदिवे याच्या वर पुढे काय भुमिका घेतात यावर केज च्या जनतेची नजर आहे.
