• Sat. Apr 18th, 2026

कार कंटेनर च्या भीषण अपघातात चार जागीच ठार.

Bybaba maske

Sep 22, 2024

कार कंटेनर च्या भीषण अपघातात चार जागीच ठार.

रोखठोक न्युज वार्ताहर 

अपघातप्रवण क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबाजोगाई लातूर रोडवारील नांदगाव पाटीजवळ रविवारी पहाटे स्विफ्ट कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात स्विफ्ट कारमधील चौघे जण जागीच ठार झाले. सर्व मयत लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील जगलपूर येथील असल्याची माहिती समोर आले आहे.

दोन दिवसांपुर्वीच जालना जिल्ह्यात अंबाजोगाई आगाराच्या बस व कंटेनरच्या अपघातात सहा जण ठार झाल्याची दुर्घटना घडली. यानंतर आज अंबाजोगाई जवळ भीषण अपघातात चौघांचा बळी गेल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री उशीरा जगलपूर येथील चार जण स्विफ्ट कारमधून (एम एच 24 ए एस 6334) छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) ला निघाले होते. मुसळधार पावसात अंबाजोगाई लातूर रोडवरील पाचपीर दर्गा जवळ स्विफ्ट कारची आणि कंटेनरची (एमएच 12 एमव्ही 7188) समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघात रविवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास झाला.

कार कंटेनरच्या खाली घुसल्याने कारचा चुराडा झाला आणि आतील चौघांचा जागीच मृत्यू झाला. मयतामध्ये बाबुराव माधव खलगरे, आत्माराम बानापुरे, सौदागर कांबळे सर्व रा. जगलपुर (खु) अशी असून एकाची ओळख पटलेली नाही. अपघाताची माहिती मिळताच बर्दापूर पोलीस ठाण्याचे एपीआय ससाणे, पीएसआय यादव, सहा. फौजदार बिडगर, हेड कॉन्स्टेबल शेख, कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी दाखल झाले सर्व मृतदेह अंबाजोगाई शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!