• Thu. Jun 25th, 2026

बीडमध्ये १० लाखांच्या बनावट नोटा चलनात ? कोलकताहून आणला कागद; आतापर्यंत ५ अटकेत

Bybaba maske

Sep 21, 2024

बीडमध्ये १० लाखांच्या बनावट नोटा चलनात ?

कोलकताहून आणला कागद; आतापर्यंत ५ अटकेत

रोखठोक न्युज वार्ताहर

 ५०० रुपयांच्या बनावट नोटांची छपाई करून त्या चलनात आणल्या जात आहेत. खोट्या २ लाख रुपयांच्या बदल्यात खरे १ लाख रूपये घेतले जायचे. या नोटा छपाईसाठी ऑनलाइन कोलकाता येथून कागद मागविला जात होता. बीड शहर पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपी निष्पन्न केले असून, एका अल्पवयीनसह दोघांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत २० लाख रुपयांची छपाई केली असून, त्यातील १० लाख रूपये मार्केटमध्ये असल्याचेही समोर आले आहे.

आकाश रमेश जाधव (रा. माळेगल्ली अजिजपुरा ह.मु. सोमेश्वर नगर, बीड) याच्यासह एक अल्पवयीन आरोपी ताब्यात आहे. १६ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता बीड शहर पोलिसांनी सापळा लावून किराणा साहित्य खरेदीसाठी येताच आकाशला ताब्यात घेतले होते त्याच्याकडून ५०० रुपयांच्या चार खोट्या नोटाही जप्त केल्या होत्या. याच्याच मुळाशी जाऊन तपास केल्यावर यातील म्होरक्या दुसराच असून, तो आपल्या घरी नोटांची छपाई करत असल्याचे समोर आले. आकाशला अटक केल्याची माहिती मिळताच म्होरक्या फरार झाला. त्याच्या स्वराज्यनगरातील घरात एक प्रिंटर आणि चार वेगवेगळ्या रंगाच्या बाटल्या, दोन टोनर आढळून आले.तसेच आतापर्यंत किती रूपये छापले आणि ते कोणाला वाटप केले. याची यादीही मिळाल्याची माहिती पोलिस

बीडमध्ये बनावट नोटा प्रकाशित केल्यानंतर एक अल्पवयीन व त्याचा भाऊ हे दोघेजण बनावट नोटा घेऊन पुणे, मुंबईला जात असत. तेथे ठराविक लोकांना दोन लाख रूपये देऊन खरे १ लाख रूपये घेऊन यायचे. या बदल्यात त्यांना कमिशनही दिले जात होते. हे पैसे कोणी घेतले ? याचाही शोध पोलिस घेत आहेत.

५०० रुपये देऊन १०० रुपयांची खरेदी

• आकाश आणि त्याचे इतर साथीदार हे ५०० रुपयांची बनावट नोट टपरी, किराणा दुकानदारांना देऊन १०० रुपयांचे सामान खरेदी करायचे. • तसेच ४०० रूपये खरे परत घ्यायचे. असे करून त्यांनी हजारो रूपये चलनात आणले आहेत.

असा झाला भंडाफोड

• एका दुकानदाराला ५०० रुपयांची बनावट नोट दिली. ती चुकून त्याच्या खिशात राहिली. त्याच्या पत्नीने कपडे धुतल्यावर या नोटाचा कलर खिशाला लागला. तिने पतीला विचारणा केल्यावर ही नोट कोणी दिली? याचा शोध घेतला.

• त्यानंतर आकाश जाधवचे नाव समोर आले. मग बीड शहर पोलिसांना माहिती देऊन या प्रकरणाचा भांडाफोड करण्यात आला.

फरार आरोपींच्या शोधासाठी पथक नियुक्त फरार दोन मुख्य आरोपींच्या शोधासाठी बीड शहर पोलिसांनी पथक नियुक्त केले आहे. पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

baba maske

Related Post

केज घरकुल घोटाळ्याच्या छायेत आणखी एक बळी? मानसिक तणावात असलेल्या नगरपंचायत कर्मचारी भिमराव मस्के यांचे हृदयविकाराने मृत्यू; जबाबदार कोण?
भांडण सोडवायला गेला, पण मृत्यूच्या दाढेत ढकलला गेला!टाकळीतील तरुणावर चाकू हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू, आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा रस्ता रोको
शॉर्टसर्किटच्या आगीत पत्रकार प्रशांत मस्के यांचे संसाराचे स्वप्न राख; घरासह कपड्यांचे दुकान भस्मसात आगीत संसारोपयोगी साहित्य, व्यवसायाचे भांडवल जळून खाक; पत्रकार कुटुंबावर संकटाचा डोंगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!