• Sat. Apr 18th, 2026

एसटी बसचा व आयशरचा भीषण अपघात ◼️या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू तर अनेकजण गंभीर जखमी 

Bybaba maske

Sep 20, 2024

एसटी बसचा व आयशरचा भीषण अपघात

◼️या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू तर अनेकजण गंभीर जखमी 

  1. रोखठोक न्युज वार्ताहर 

गेवराई: राष्ट्रीय महामार्ग 753 जालना वडिगोद्री राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. ही घटना सकाळी 8 च्या दरम्यान घडली. हा अपघात एवढा भीषण होता की, जागीच सहाजण ठार झाले. अनेकजण गंभीर जखमी झाली आहेत. जखमींचा आकडा व मृतांची नावे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.

मिळालेल्या माहितीनुसार सकाळी आठच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग ७५३ जालना वडिगोद्री राष्ट्रीय महामार्गावर बस व आयशरचा भीषण अपघात झाला. बस एम एच 20 बि एल 3553 अंबाजोगाई येथुन संभाजी नगरच्या दिशेने जात होती. तर, आयशर क्रमांक एमएच 01 सी आर 8099 अंबड कडून गेवराई च्या दिशेने संत्रा घेऊन जात होता. दरम्यान शहापूर ते मठ तांडा या भागात बस व आयशरचा समोरासमोर जोरदार धडक होऊन अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता कि, बस व आयशरचा समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. या अपघातात सहाजण जागीच ठार झाले आहेत.

मृतांची ओळख व जखमींचा आकडा स्पष्ट नाही?

या भीषण अपघातात बसमधील सहा प्रवाशी ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये मृतांची नावे व जखमींचा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. मठ तांडा व शहापूर येथील ग्रामस्थांनी बसमधील अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. हा अपघात एवढा भिषण होता कि बस मध्ये प्रवाशांच्या रक्ताचा खच साचला आहे. या आपघतामुळे राष्ट्रीय महामार्ग 753 वरती वाहनांच्या दुतर्फा लांबच लांब रांगा होत्या. घटनास्थळी गोंदी व अंबड पोलिसांनी धाव घेत वाहतुक सुरळीत केली आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!