• Sun. Apr 19th, 2026

अडीच वर्षांत महिला नगराध्यक्ष असताना महिलांन साठी साधी मुतारी बांधली नाही..अण म्हणे आम्ही विकास केला. प्रशासकाच्या काळातील निधी व नगरोत्थान योजनेंतर्गत झालेल्या रस्त्यावर यांच्या बढाया!! 3 कोटी 50 लाखाचा दलित वस्तीचा निधी इतरत्र वळवला.  

Bybaba maske

Sep 20, 2024

अडीच वर्षांत महिला नगराध्यक्ष असताना महिलांन साठी साधी मुतारी बांधली नाही..अण म्हणे आम्ही विकास केला.

  1. प्रशासकाच्या काळातील निधी व नगरोत्थान योजनेंतर्गत झालेल्या रस्त्यावर यांच्या बढाया!!

3 कोटी 50 लाखाचा दलित वस्तीचा निधी इतरत्र वळवला?

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज नगरपंचायत च्या हद्दी मध्ये मुतारी,शौचालय कोठेच नाही.केज शहर 60हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेल गाव आहे. बीड जिल्ह्य़ातील मोठी बाजारपेठ असुन 140 गावाचा सहभाग केज तालुक्यात आहे.आठवड्यातून दोन वेळेस मंगळवार व शुक्रवार असा बाजार भरतो,त्यामुळे खेड्यापाड्यात येणारी महिला पुरूषांची संख्या खुप मोठी आहे हमेशा वर्दळीचे असलेले हे शहर आहे.पण बस स्टॅंड शिवाय सार्वजनिक मुतारी किंवा शौचालय शहरात कोठेही अढळुन येत नाही दोन आठवडी बाजार तळ असुन तिथे ही कुठल्याच प्रकारची व्यवस्था नसल्याने खुप गैर सोईचा सामना जनतेस करावा लागतो विषेश म्हणजे महिला वर्गाला अपमानास्पद उघड्यावर मुत्रविसर्जन किंवा मलविसर्जन करावे लागते हे एका महिला नगराध्यक्ष असलेल्या नगरपंचायत ला भूषवायला आहे का? भाजी पाला विक्री करणाऱ्या महिला विक्रत्यास आठ,नऊ घंटे लघवी दाबून बसावी लागते त्या मुळे त्यांना किडनीचे विकार होऊ शकतात असे डाॅक्टरांचे म्हणणे आहे.केज शहरात नगरपंचायत चे फिरते शौचालय असताना त्यास पाण्याच्या टाकी असलेल्या मोकळ्या जागेत ठेवले आहे. 

 जनतेतून असा प्रश्न आहे की हे फिरते शौचालय वस्तुसंग्रहालय ठेवून याला बघण्यासाठी टिकीट आकारणार आहात का? केज नगरपंचायत च्या समस्त स्त्रि वर्गाच गेल्या अडीच वर्षांपासून प्रतिनीधी करणारे नगराध्यक्षा साहेब स्त्रियांच्याच समस्या कश्या विसरू शकतात असा प्रश्न सामान्य महिलावर्ग करत आहे.पुरुष कोठे ही आडोसा धरून मोकळे होतात पण हे सार्वजनिक आरोग्या साठी योग्य आहे का?

गेल्या अडीच वर्षांपासून जनविकास परिवर्तन आघाडी व काँग्रेस केज नगरपंचायतची सत्ता चाखत आहे पण विकास शुन्य आहे.नगरोत्थान योजनेंतर्गत रस्ते झालेत पण नगरपंचायत ने नाहरकत देण्या पलीकडे काही केले नाही, मुख्य रस्त्यावरच्या स्टेट लाईट चालू करण्या साठी केज संघर्ष समितीला सतत अंदोलन करावे लागले तेव्हा अडीच वर्षांत आर्धी लाईट चालू झाली.

मागसवर्गीय नगराध्यक्ष असताना दलित निधी दुसरी कडे वळवला जात आहे यावर माहिती अधिकार कार्यकर्ते 24 तारखेपासून अमरण उपोषण करतायत आणि केजच्या नगराध्यक्ष व स्वतःला सर्वेसर्वा म्हणून घेणारे आपली पाठ ठोपतत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!