• Thu. Jun 25th, 2026

केज बांधकाम विभागात राष्ट्रध्वजाचा अवमान मुक्तिसंग्रामदिनी ध्वजारोहणावेळी हलगर्जीपणा

Bybaba maske

Sep 19, 2024

केज बांधकाम विभागात राष्ट्रध्वजाचा अवमान

मुक्तिसंग्रामदिनी ध्वजारोहणावेळी हलगर्जीपणा

रोखठोक न्युज वार्ताहर 

येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मंगळवारी ध्वजारोहण सोहळ्याला उपविभागीय अभियंता युवराज मळेकर गैरहजर होते. या ठिकाणी ध्वजारोहण करताना ध्वज जमिनीवरच फडकविण्यात आला. त्याचवेळी उपस्थितांनी टाळ्याही वाजविल्या. हा राष्ट्रध्वजाचा अवमान झाला असून या प्रकरणी चौकशी करून दोषींविरूद्ध योग्य ती कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) तालुका उपाध्यक्ष मालोजी गलांडे यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दरम्यान, या कार्यालयात ध्वजारोहण केलेले शाखा अधिकारी रमेश परजणे यांच्याशी संपर्क साधला असता, उपविभागीय अभियंता युवराज मळेकर यांना काहीतरी अर्जेंट काम लागल्यामुळे त्यांनी १३ सप्टेंबर रोजी कार्यालयाचे ध्वजारोहण करण्यासाठी माझ्या नावाचा आदेश काढल्याचे सांगितले व त्याप्रमाणे आपण ध्वजारोहण केल्याचेही परजणे यांनी मान्य केले.

ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वजाचा अवमान

या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने ध्वज फडकविण्यात आला आहे. ट्रेमध्ये ध्वज घेऊन तो उंचीपर्यंत घ्यायला हवा होता; परंतु या ठिकाणी जमिनीला स्पर्श होईल असा ध्वज जमिनीवरच झटकला आहे. ध्वजाचा जमिनीला स्पर्श होणे, हा ध्वज संहितेनुसार राष्ट्रध्वजाचा अवमान आहे. असा अभिप्राय उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे यांनी यांनी सांगीतले.

मी रुग्णालयात आहे…

■ मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ध्वजारोहणाला आपण हजर नसल्याबद्दल उपविभागीय अभियंता युवराज मळेकर यांना विचारले असता मला मणक्याचा त्रास वाढल्यामुळे मी पुण्याच्या खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

■ तसेच शाखा अभियंता रमेश परजणे यांनी ध्वजारोहण करावे, असा कार्यालयीन आदेश आपण काढल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

असा कोणताही रुग्ण नाही…

याप्रकरणी पुणे येथील संबंधित खासगी रुग्णालयाच्या आंतररुग्ण व बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांची नोंद असलेल्या अॅडमिशन डेस्कच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी प्रतिनिधीने संपर्क साधला असता युवराज मळेकर नावाचा असा कोणताही रुग्ण आमच्या रुग्णालयात उपचार घेत नसल्याची माहिती त्यांनी दिली.

baba maske

Related Post

केज घरकुल घोटाळ्याच्या छायेत आणखी एक बळी? मानसिक तणावात असलेल्या नगरपंचायत कर्मचारी भिमराव मस्के यांचे हृदयविकाराने मृत्यू; जबाबदार कोण?
भांडण सोडवायला गेला, पण मृत्यूच्या दाढेत ढकलला गेला!टाकळीतील तरुणावर चाकू हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू, आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा रस्ता रोको
शॉर्टसर्किटच्या आगीत पत्रकार प्रशांत मस्के यांचे संसाराचे स्वप्न राख; घरासह कपड्यांचे दुकान भस्मसात आगीत संसारोपयोगी साहित्य, व्यवसायाचे भांडवल जळून खाक; पत्रकार कुटुंबावर संकटाचा डोंगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!