• Sat. Apr 18th, 2026

कार-मोटारसायकल च्या अपघातात एक ठार एक गंभीर जखमी.

Bybaba maske

Sep 18, 2024

कार-मोटारसायकल च्या अपघातात एक ठार एक गंभीर जखमी.

रोखठोक न्युज वार्ताहर 

इनोव्हा आणि दुचाकीची धडक होऊन घडलेल्या अपघातात एकजण ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास बीड-मांरसुबा रस्त्यावर पाली जवळ घडली आहे.

बीड-मांजरसुंबा रस्त्यावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून या रस्त्यावर नेहमीच अपघात होऊन यामध्ये अनेक निष्पापांचे बळी जात आहेत. आजही बुधवारी (दि.१८) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास इनोव्हा कार क्र. एम.एच. २३ ई ७८७८ याची व दुचाकी क्र. एम.एच.२३ बी ई ७७१२ यांची समोरासमोर धडक झाली. यामुळे घडलेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार शेख सरवर चांद (वय ५५वर्ष) रा. बालेपीर, बीड हे ठार झाले तर शेख नदीम बशीर (वय ४२वर्ष ) हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघात घडताच प्रवाशांनी थांबून अपघातग्रस्तांना मदत करत दवाखान्यात दाखल केले. परंतु तोपर्यंत शेख सरवर यांची प्राणज्योत मालवली होती. जखमीवर बीड येथे उपचार सुरू आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!