केज कृषी कार्यालयाचा भोंगळ कारभार कृषी साहित्या साठी कार्यालयात गर्दी पण कार्यालयास कुलूप.
शेतकर्याची कृषी कार्यालया समोर गर्दी.कार्यक्रम पिसेगाव येथे.
रोखठोक न्युज वार्ताहर
केज कृषी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांना फवारे वाटप दि.१८ सप्टेंबर २०२४ रोजी करण्यात येणार आहेत परंतु शेतकऱ्यांना फवारे वाटप केज कृषी कार्यालयांमधून न करता पिसेगाव येथे करत आहे पण कृषी कार्यालयाने अशी कुठली सुचना शेतकर्याना दिली नाही किंवा तसी नोटीस कार्यालयाच्या बाहेर लावली नसल्या कारणाने च्या कृषी कार्यालया समोर शेतकरी फवारे, अवजारे घेण्य साठी कार्यालया समोर प्रचंड गर्दी केली आहे. कृषी कार्यालयाने अश्या प्रकाच्या बेफिकीरी वागण्याने शेतकर्याचे हाल होत आहेत.
नमिता मुंदडा यांच्या दबावाखाली येऊन केजच्या कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सांगितले की तुम्हाला जे शेतीसाठी मिळणारे फवारे आहेत ते केज कृषी कार्यालयांमधून न मिळता ते पिसेगाव येथून मिळणार आहेत केज तालुक्यातील शेतकऱ्यांना केज कृषी कार्यालय मधून फवारे नेण्यास सोपे होते परंतु कृषी अधिकाऱ्यांनी आणि आमदार नमिता मुंदडा यांनी पिसेगावला वाटप ठेवून शेतकऱ्यांसाठी अडचण वाढवली आहे.यामधून स्पष्ट दिसत आहे केज कृषी कार्यालयाचा भोंगळ कारभार आणि आमदार नमिता मुंदडा यांचा लहरी पणा मुळे शेतकरी वर्ग नाराज झाला असून त्यानी कृषी कार्यालया समोर एकच गर्दी केली आहे.
