परळी होतेय गावठी कट्टयाचा आडा,एक दिवस आड सापडतोय कावठी कट्टा .
पिस्तूल लावून बाहेर पडला, पोलिसांनी लगेच पकडला.
रोखठोक न्युज वार्ताहर
बिअरबारमध्ये दारू ढोसल्यानंतर रुबाबात कंबरेला पिस्टल लावून एक व्यक्ती बाहेर पडला. हीच माहिती परळी ग्रामीण पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लगेच सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिस्टलही जप्त केला आहे. ही कारवाई रविवारी पहाटेच्या सुमारास परळी तालुक्यातील धर्मापुरीं फाट्याजवळ करण्यात आली. संतोष वैजनाथ धावते (वय ३३, रा.. ही बहादुरवाडी फाटा ता. परळी) असे के पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. संतोष याने धर्मापुरी फाट्याजवळील एका बिअरबारमध्ये दारू ढोसली.
यावेळी त्याच्या कंबरेला पिस्टल होते. ही माहिती परिसरातील लोकांनी परळी ग्रामीण पोलिसांना दिली. त्यांनी लगेच आपल्या पथकामार्फत सापळा लावला. संतोष हा बारच्या पुढे जाऊन एका पेट्रोल पंपाजवळ थांबला होता. त्याच ठिकाणी पोलिसांनी त्याला पकडले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे पिस्टल सापडले. जिवंत काडतूस नव्हते. ही कारवाई पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली परळी ग्रामीणचे सहायक पोलिस निरीक्षक अनमोल केदार, विष्णू घुगे, सुनील अंनमवार, हरगावकर आदींनी केली.
