• Sat. Sep 19th, 2026

केज शहरातील मुलांचे अपहरण प्रकरणाला वेगळे वळण. न्यायालयाच्या निदर्शनाने आरोपीच्या फिर्यादीवरून ११ जणांवर गुन्हा नोंद.

Bybaba maske

Sep 25, 2024

केज शहरातील मुलांचे अपहरण प्रकरणाला वेगळे वळण.

न्यायालयाच्या निदर्शनाने आरोपीच्या फिर्यादीवरून ११ जणांवर गुन्हा नोंद.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज शहरात काल अपहरण करते म्हणून काही युवकांनी आरोपी विजय भंडारी यास जबरदस्त मारहाण केली होती.आरोपी हा केज शहरात ताडी विक्रीचा अवैध व्यवसाय केल्याच नागरिकात चर्चा आहे.

शाळकरी मुलाचे अपहरण करण्याच्या संशयावरून येथील मच्छीमार्केट परिसरात सोमवारी एकास पकडून त्याला बेदम मारहाण करून त्याची कार फोडून नुकसान केल्याप्रकरणी केज न्यायालयाच्या निर्देशानुसार एकूण ११ जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. केज येथील भीमनगर भागात अंकुर मस्के याला चॉकलेटचे आमिष दाखवून त्याचे अपहरण करण्याच्या संशयावरून मारहाणीची घटना घडली होती. तर याप्रकरणी पोलिसांनी धनराज वळसे या केज, आणि विजय गोपीनाथ भंडारी या सनसर, जि. पुणे यांना ताब्यात घेऊन मंगळवारी केज न्यायालयात हजर गुन्हेगाराला केले. करण्याचा अधिकार शिक्षा न्यायालयाला आहे, परंतु जमावाने आपल्याला बेदम मारहाण करुन कार फोडल्याची कैफियत विजय भंडारी याने मांडली. यावर आरोपीची फिर्याद नोंदवून घेण्याचे आदेश केज न्यायालयाने दिले. त्यानुसार मारहाण करुन कार फोडणाऱ्या ११ जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला.यात शरद धिवार,शाबेर हबीब शेख व इतर सात आठ अनओळखीच्या लोकांवर गुर न.508/2024 कलम 189(12)192(2)191(3)190,118,115,352,324 (4/5) या कलमानुसार केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!