• Wed. Apr 29th, 2026

दलित वस्तीचा निधी नगरपंचायतच्या सर्वेसर्वा म्हणून घेणाऱ्यांनी आपल्या आश्रम शाळेकडे वळवला.

Bybaba maske

Sep 26, 2024

दलित वस्तीचा निधी नगरपंचायतच्या सर्वेसर्वा म्हणून घेणाऱ्यांनी आपल्या आश्रम शाळेकडे वळवला.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज नगरपंचायत हद्दीत लोकशाहिर आण्णाभाऊ साठे मागासवर्गीय योजनेंतर्गत दलित वस्ती साठी निधी आणला होता पण केज नगरपंचायत च्या दलित नगराध्यक्ष व स्वतःला केजचा सर्वेसर्वा समजणार्‍या नेत्यांने चुकीची मागासवर्गीय समाजाची संख्या दाखवून समाजकल्याण विभागाला चुकीची माहिती देऊन जिथे दलित समाज नगण्य आहे तेथे निधी वळवला आहे याला नगरपंचायत चे दलित नगराध्यक्षांचा छुपा पाठींबा आहे.याच सगळ्याचा फायदा घेऊन जनविकास च्या सर्वेसर्वा म्हणून घेणाऱ्यांनी आपली पांडुरंग आश्रम शाळा जिकडे आहे तिकडे निधी हस्तांतरित केला आहे.हा निधी पांडुरंग आश्रम शाळा ते इनामदार वस्ती असा नियोजित केला आहे या कामाची चौकशी व्हावी म्हणून सुदेश सिरसट, आशोक गायकवाड  व अजय भांगे यांनी दोन दिवस उपोषण सुद्धा केले पण नगराध्यक्षाने व स्वताला दलिताचा मसीहा व सर्वेसर्वा म्हणून घेणाऱ्यांने आपल्या आश्रम शाळे कडे व आपल्या भाऊबंदकी च्या ईट भट्टी कडे जाण्या करता या निधीचा गैरवापर चालवला आहे यावर तात्काळ समाजकल्याण विभागाने यांची चौकशी करावी अशी मागणी दलित समाज करत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!