• Sun. Sep 20th, 2026

एकतर्फी प्रेमातून तरुणाने मुलीच्या वडिलांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न आरोपीचे नाव आले समोर,आरोपी हा जुना शेजारीच.

Bybaba maske

Apr 23, 2025

एकतर्फी प्रेमातून तरुणाने मुलीच्या वडिलांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

आरोपीचे नाव आले समोर,आरोपी हा जुना शेजारीच.

रोखठोक न्युज वार्ताहर 

 केज येथे शाळेतून गावाकडे आपल्या कारने परत जात असणाऱ्या आरोपी सुरज दिलीप गुडं वय 28 याने शिक्षकाच्या गाडीवर ट्रॅक्टर घालून त्याला लोखंडी रॉडने डोक्यात गंभीर मारहाण करून जीव मारण्याचा प्रयत्न केला. यात बाजीराच डोईफोडे हे शिक्षक रक्तबंबाळ झाले असू अतिरक्त स्रावाने ते बेशुध्द पडले. या घटनेने बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. जखमी शिक्षकाची प्रकृती ही गंभीर असून त्याच्यावर बीड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या बाबतची माहिती अशी की, दि. २२ एप्रिल रोजी सकाळी ११:०० वां. च्या सुमारास केज तालुक्यातील वरपगाव येथील जय किसान माध्यमिक विद्यालय वरपगाव येथे कार्यरत असलेले शिक्षक बाजीराव डोईफोडे हे आपल्या

एकतर्फी प्रेमातून आरोपी सुरज गुंड मुलीच्या वडिलांच्या सुझुकी चार चाकी गाडी क्र. (एम एच २३ बी एच ८१६१) ने बीडकडे जात असताना केज-नांदूरघाट-चौसाळा या रोडवर असलेल्या हनुमंत पिंपरीच्या बोरगाव चौका जवळ त्यांना एका अज्ञात ट्रॅक्टर चालकाने जोराची धडक दिली. त्या नंतर त्याने दरवाजा उघडून आत बसलेले शिक्षक बाजीराव डोईफोडे यांना लोखंडे रॉडने जबरदस्त मारहाण करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत बाजीराव डोईफोडे हे गंभीर जखमी झाले असून अतीरक्तस्त्रावाने ते बेशुद्ध पडले. या घटनेतीलआरोपी सुरज गुंडने हा अपघात असल्याचा बनाव केला 

माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे, पोलीस उपनिरिक्षक आनंद शिंदे आणि पोलीस नाईक शिवाजी कागदे हे घटनास्थळी हजर झाले. त्या नंतर पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब बांगर यांनी या प्रकरणातील चारचाकी गाडी आणि ट्रॅक्टर हे दोन्ही वाहने केज पोलीस ठाण्यात आणले आहेत.

प्रेम प्रकरणातून जीवघेणा हल्ला झाला असल्याचा कयास :- या घटनेतील आरोपी सुरज गुंड आणि हल्ल्यात जखमी असलेले बाजीराव डोईफोडे यांच्या मुलीच्या प्रेम प्रकरणातून आणि तुमच्या मुलीचे माझ्याशी लग्न का लावून देत नाहीत ? म्हणून हल्ला झाला आहे.

सहा महिन्यात पूर्वी झाला होता गुन्हा दाखल : इंस्टाग्रामवर मैत्री झाल्याने आरोपी सुरज गुंड यांने मुलीला फसवून तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर दहा ते बारा वेळा तिच्या इच्छे विरुद्धध शरीर सबंध प्रस्थापित केले असल्याच्या आरोपा वरून सप्टेंबर २०२४ मध्ये सहा महिन्या पूर्वी त्याच्या विरुद्ध बलात्कार, अट्रॉसिटी या सारख्या गंभीर गुन्ह्यात केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ४८५/२०२४ भा. न्या. सं. २०२३ अधिनियम कलम ६४ (१), ६४ (२) (एम), ३३२ (ब), ११५(२), ३५२, ३५१(१), ३५१(२) यासह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ कलम ३ (२) (पाच), ३(२) (व्ही ए), ३(१) (आर), ३(१) (एस) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे ६६, ६६ (ई) नुसार बलात्कार, अट्रॉसिटी आणि आयटी अक्ट नुसार गुन्हे दाखल असून त्याचा तपास सहाय्यक पोलीसअधीक्षक कमलेश मीना हे करीत आहेत.

तरुणीची बापाला अंगावर गाडी घालून मारण्याची तरूणा सोबत चॅटिंग :– प्रेमाला अडसर ठरत असलेल्या बापाच्या अंगावर गाडी घालून ठार मारण्याची चॅटिंग केलेली असून तो तरुण तिला म्हणतो की, वेळ आल्या नंतर तसे पण करू.

त्रासाला कंटाळून केज सोडले : पूर्वी बाजीराव डोईफोडे यांचे कुटुंब हे केज येथे राहत होते. केजमध्ये त्यांचे स्वतःचे पक्के घर होते. परंतु त्यांच्यावर हल्ला केलेल्या तरुणाच्या त्रासाला आणि धमक्यांना घाबरून त्यांनी केज येथील घर विकून सध्या ते बीड येथे किरायाच्या घरात भाड्याने राहत आहेत.

baba maske

Related Post

विलास घुले हत्या प्रकरणाला नवा ट्विस्ट; CIDच्या 200 पानी चार्जशीटमध्ये खासदार सोनवणेंच्या मुलाचे नाव नाही! केज न्यायालयात दहा आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल; 15 सप्टेंबरला CIDची कारवाई
फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!