जलजीवनचा बट्ट्याबोळ; पाणी योजना अपूर्णच,पाण्यासाठी नागरिकांची वणवण
योजनेतंर्गत काम तरीही पाणी नाही ; योजना ठरतेय फेल
राष्ट्रीय पेय जल योजनेला मिळालेला 32 कोटी निधी गेला कुठे ?
रोखठोक न्युज वार्ताहर
राज्यातील अनेक भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.यामुळे पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.केज तालुक्यातील चिंचोलीमाळी सर्कलच्या जवळपास दहा ते बारा गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली.
पंतप्रधानांनी जलजीवन मिशन हर घर नल से जल योजना सुरू केली.मात्र बीडच्या केज तालुक्यातील चिंचोलीमाळी सर्कलच्या बहुतांश काही गावांना फक्त नळ आहेत,पण जल नाही. कोट्यावधी रुपये खर्च करून सुरू केलेली ही योजना अद्यापही पूर्ण झालेली नाही. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आजही काही गावांमध्ये पाण्यासाठी महिलांची वणवण पाहायला मिळत आहे.यामुळे जलजीवन मिशन योजनांचा बट्ट्याबोळ झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागात शुद्ध आणि नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी हर घर नल से जल घोषणा देत जल जीवन मिशन अंतर्गत योजना सुरू केली आहे.मात्र सरकारची कितीही इच्छा असली तरी योजना अमलात आणण्यासाठी प्रशासनाने ही गोष्ट गांभीर्याने घेणार नसेल तर जल जीवन मिशनचे पैसे वाया गेल्याशिवाय राहणार नाही असा आरोप नागरिक करत आहेत.तसेच कोट्यावधी रुपयाचा निधी भाजप नेत्यांनी हडप केल्याचा नागरिकांनी आरोप आहे.
°१० गावात भीषण टंचाई
अनेक भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.यामुळे पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.केजच्या चिंचोली माळी सर्कलच्या बेलगाव,जाधव जवळा,आरणगाव,टाकळी, डोनगाव,कदमवाडी,शिरपूरा यासह जवळपास दहा ते बारा गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.गावातील पाण्याच्या विहिरी,तलाव अक्षरशः कोरडेठाक पडले आहेत.पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
• बेलगांव येथे जलजीवनचे काम बोगस
केज तालुक्यातील बेलगाव येथे जलजीवनचे काम बोगस झाल्यामुळे पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरु आहे. मात्र गुत्तेदार कुठे फरार झाला.गुत्तेदार व एका भाजपच्या युवा नेत्यांनी जलजीवनच्या कामातून कुठे होती निधी हडप केल्याचा नागरिकाचा सवाल आहे.
•••••••
जलजीवनचा बट्ट्याबोळ ; पाणी योजना अपूर्णच,पाण्यासाठी नागरिकांची वणवण
योजनेतंर्गत काम तरीही पाणी नाही ; योजना ठरतेय फेल
राष्ट्रीय पेय जल योजनेला मिळालेला 32 कोटी निधी गेला कुठे ?
