• Thu. Jun 4th, 2026

खासदार बजरंग सोनवणे यांच्या पाठपुराव्याला यश.  धाराशिव-बीड-संभाजीनगर रेल्वे मार्गासाठी हवाई अन् जमिनीवर पाहणी  मध्य रेल्वेकडून सर्व्हेचे आदेश, जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदल्याकडे वाट

Bybaba maske

Jul 20, 2025

खासदार बजरंग सोनवणे यांच्या पाठपुराव्याला यश.

 धाराशिव-बीड-संभाजीनगर रेल्वे मार्गासाठी हवाई अन् जमिनीवर पाहणी

 मध्य रेल्वेकडून सर्व्हेचे आदेश, जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदल्याकडे वाट

रोखठोक न्यूज/प्रतिनिधीः

खा. बजरंग सोनवणे यांनी अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे मार्गाला गती दिलीच पण याही पुढे जावून धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाच्या कामालाही गती देण्यासाठी प्रयत्न केले असून ते प्रयत्न फळाला येऊ लागले आहेत. प्रस्तावित रेल्वेमार्गाच्या हवाई आणि जमिनी पाहणीचे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे.

मध्य रेल्वेच्या वतीने सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले असून त्याचे कंत्राट देखील देण्यात आले आहे. शुक्रवारपासून या पाहणीला

सुरुवात झाली असून आणखी दोन दिवस ही पाहणी चालणार आहे. खा. बजरंग सोनवणे यांच्या प्रयत्नांमुळे बीड जिल्ह्यातील अहिल्यानगर-बीड-परळी या रेल्वेमार्गाच्या कामाला गती आलेली आहे. अगदी आष्टी

ते बीडपर्यंतची रेल्वेची चाचणी झालेली असून आता बीडला रेल्वे घेवून येण्यासाठी काहीच कालावधीची प्रतिक्षा करावी लागणार आहे. ज्यामुळे रेल्वे धावू शकलेली नाही, अशा विद्युतीकरणाचे काम जोरात सुरू आहे. याच बरोबर धाराशिव बीड छ. संभाजीनगर या रेल्वेमार्गाची मागणीही खा. सोनवणे यांनी केली होती. यानंतर अर्थसंकल्पामध्ये सर्वेक्षणासाठी तरतूद करण्यात आली होती. तसेच हा प्रस्तावित रेल्वे मार्ग महत्वाचा असल्याने या मार्गाबाबत रेल्वे मंत्रालयाकडून संपूर्ण पाठपुरावा सुरु आहे. या रेल्वे मार्गाच्या प्राथमिक सर्वेक्षणाचे आदेश मध्य रेल्वेने आरवी इंजिअरिंग कन्सल्टन्सी हैद्राबाद यांना दिले आहेत. संबंधितांनी या रेल्वेमार्गाची हवाई आणि जमिनी पाहणी सुरु केली आहे. शुक्रवार ते रविवार या तीन दिवसात कंपनीच्या माध्यमातून या रेल्वेमार्गाची हवाई आणि जमिनी पाहणी केली जात आहे. त्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येत असून कंपनीने तसे जिल्हाप्रशासनाला कळविले आहे. शुक्रवारी यासाठी ‘आरवी’च्या

अधिकारी कर्मचाऱ्यांचे हेलिकॉप्टरमधून बीडच्या अवकाशातून होते. आणखी दोन दिवस पाहणी होणार असून त सदरचा अहवाल मध्यरेल्वे कडे सोपविला जाणार आहे. अहवाल रेल्वेविभागाकडे झाल्यानंतर आपण पुन्हा रेल्वेमंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांची भेट घेवूना प्रक्रियाही तातडीने सुरू अशी मागणी करणार या जिल्ह्याचा चेहरा आपल्याला बदलायचे अशी भावना खा. सोनवण व्यक्त केली.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!