• Sun. Sep 20th, 2026

२० लाख ७१ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाला सह लाखोचा गुटखा पकडला.

Bybaba maske

Jul 24, 2025

२० लाख ७१ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाला सह लाखोचा गुटखा पकडला.

रोखठोक न्यूज वार्ताहर 

मागील काही दिवसांपासून अवैध धंद्यावर निर्बंध आले असले तरी गुटख्याची विक्री मात्र तेजीत सुरु होती. शहरात आणि गल्लीबोळात ही टपऱ्यावर गुटखा आरामात मिळत असल्याचे चित्र असताना मध्यरात्री १ च्या सुमारास धुळे-सोलापूर हायवेवरील वानगाव शिवारात नेकनूर पोलिसांनी लाखोंचा गुटखा ताब्यात घेतला आहे. रजनीगंधा, बाबा आणि विमल कंपन्याचा हा गुटखा असल्याची माहिती आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांना आयशर टेम्पोतून गुटखा येतं असल्याची माहिती मिळाल्यानंतर मध्यरात्री १ च्या सुमारास सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. यावेळी एक स्विफ्ट कार ही पोलिसांनी ताब्यात घेतली असून यात २० लाख ७१ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरु असून या कारवाईमुळे गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

baba maske

Related Post

विलास घुले हत्या प्रकरणाला नवा ट्विस्ट; CIDच्या 200 पानी चार्जशीटमध्ये खासदार सोनवणेंच्या मुलाचे नाव नाही! केज न्यायालयात दहा आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल; 15 सप्टेंबरला CIDची कारवाई
फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!