पहाटे पहाटे गुटखा साठ्यावर छापा.
३५ ते ४० लाखांचा गुटखा पकडला
रोखठोक न्यूज वार्ताहर
राज्य सरकारने तंबाखूजन्य पदार्थावर बंदी घातली असताना सुद्धा बीड जिल्ह्यात खुलेआम गुटखा विक्री होत असल्याचे चित्र दिसत आहे. गुटखा माफीयावर कोणतीही कारवाई होत नसल्याने अन्न व औषध कार्यालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
दिनांक 26 सप्टेंबर शुक्रवार रोजी केज पोलीस ठाणे हद्दीत मस्साजोग येथील एका शेतात गुटखा साठवून विक्रीसाठी नेण्याच्या तयारीत असलेल्या पिकप वाहनावर धाड टाकून पोलिसांनी तब्बल ३५ लाखांचा गुटखा जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
बीड स्थानिक शाखेला रात्री मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पिकप भरून मोठ्या प्रमाणात गुटखा विक्रीसाठी जात असल्याचे समजले.त्यानंतर रात्रीच पोलिसांनी शेताजवळ सापळा रचून पिकपसह गुटखा जप्त केला.
ही कारवाई बीड पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत ,अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने केली. जप्त केलेल्या गुटख्याची किंमत अंदाजे 35 ते 40 लाख रुपयांपर्यंत असल्याचे सांगितले जात आहे.
गुटखा विक्री,वाहतूक व साठा बंदी असूनही असे अवैध धंदे सुरु असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू असून गुटखा माफियामागे स्थानिक पोलिसा आशीर्वाद आहे याबाबत विविध चर्चा रंगल्या आहेत.जिल्ह्यातील सीमावर वाहन तपासणी कसून केली जात असताना देखील गुटखा कुठून आला याची देखील माहिती स्थानिक पोलिसांनी घेणे आवश्यक आहे.