बीड जिल्ह्यात पुन्हा तरूणाचा खून.
रोखठोक न्यूज वार्ताहर
साडेआठच्या सुमारास यश देवेंद्र ढाका (वय २२, रा. बीड) तरुणाचा चाकूने वार करून खून करण्यात आला. छातीत झालेल्या दोन वारांमुळे तो रक्तबंबाळ अवस्थेत कोसळला. तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यश हा अभियांत्रिकी शिक्षण घेत होता. तो बीडमधील एका वृत्तपत्राचे उपसंपादक देवेंद्र ढाका यांचा मुलगा होता.
गजबजलेल्या माने कॉम्प्लेक्स भागात झालेल्या या हत्याकांडाने शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मध्यवर्ती भागात खून घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक उरलेला नाही, असे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.
खूनाचे नेमके कारण अद्याप उघड झालेले नाही. हल्लेखोर कोण आहेत हे समजू शकलेले नसल्याने पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तत्काळ आरोपीचा शोध घेत त्याला ताब्यात घेतल्याची माहिती आहे.पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे