पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण सोडत जाहीर
११ पंचायत समित्यांच्या सभापतिपदासाठीची सोडत जाहीर
रोखठोक न्यूज वार्ताहर
बीड जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांच्या सभापतिपदासाठीची आरक्षण सोडत मंगळवारी काढण्यात आली असून अडीच वर्षाच्या कालावधीचे सभापतींचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. त्यानुसार जिल्ह्यात अनुसूचित जातीसाठी राखून ठेवावयाच्या सभापतीपदाच्या एका जागेसाठी परळी पंचायत समिती निश्चित करण्यात आली आहे. आता बीड जिल्ह्यातील ११ पंचायत समिती सभापतीपदासाठी आरक्षण असे असणार आहे.
🔶️अनुसूचित जाती : परळी
🔻ओबीसी : बीड
🔷️ओबीसी महिला : गेवराई, धारुर
🔻सर्वसाधारण महिला :माजलगाव, आष्टी, शिरुरकासार, अंबाजोगाई
🔶️सर्वसाधारण : केज, वडवणी, पाटोदा
आरक्षण सोडतीला उपजिल्हाधिकारी सामान्य शैलेश सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांची उपस्थिती होती.