बीड जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या-महादेव घुले
50 हजार रु शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या.
रोखठोक न्यूज प्रतिनिधी
मागील पंधरा दिवसापासून बीड जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांची शेती मातीसगट वाहून गेली आहे.जनावरे गुरे वाहून गेली आहेत.बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट 50 हजार रु शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे केज तालुकाध्यक्ष महादेव घुले यांनी केली आहे.
बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.
सध्या बीड जिल्ह्यात सर्वच तालुक्यात पावसाने मोठे नुकसान झाले असुन सोयाबीन,कापुस पुर्णतः हातातुन गेले आहे.नदीकाठचे घरे, जनावरे वाहुन गेली असुन प्रत्येक गाव या अतिवृष्टीने बाधित झाले आहे.कोणतेही पंचनामे न करता जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची अर्थिक मदत तात्काळ द्यावी सद्य स्थितीत जिल्ह्यातील सर्वच नद्या आपले पात्र सोडुन १ ते १.५ कि.मी क्षेत्रातुन वाहत आहेत त्यामुळे अतोनात नुकसान झाले आहे.अनेक गावात पाणी शिरले असुन जनावरांचे गोठे वाहुन गेले असून पशुधनाची देखील जिवीत हानी झाली आहे. त्यामुळे आपण सबंध जिल्हा ओला दुष्काळ म्हणून जाहिर करावा व ज्याची घरे,जनावरे वाहुन गेली त्यांना वेगळी वेगळी मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
शेती हा शेतकऱ्यांचा मुख्य आधार आहे. अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीमुळे उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून त्याला तात्काळ मदतीची गरज आहे.शेतकऱ्यांना सरसगट मदत मिळाली पाहिजे केज तहसीलदार यांच्या मार्फत थेट मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे निवेदन देण्यात आले.शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहून सर्व स्तरांवर लढा देण्याचा निर्धार महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे केज तालुकाध्यक्ष महादेव घुले यांनी व्यक्त केला.शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मी सदैव बांधील असून,नुकसान भरपाई मिळेपर्यंत पाठपुरावा करत राहणार असल्याचे सांगितले.यावेळी केजचे तहसीलदार यांना निवेदन देतांना मनसेचे बीड जिल्हा उपाध्यक्ष कल्याण केदार,तालुकाध्यक्ष अतुल कुलकर्णी,तालुका उपाध्यक्ष महेश कुलकर्णी,तालूका सचिव प्रवीण साखरे,उपाध्यक्ष सौरभ हिरवे,सुरज डोईफोडे,उत्तरेश्वर बारगजे उपस्थित होते.