• Sun. Apr 19th, 2026

आमाला बी द्या की आगीनगाडी

Bybaba maske

Oct 2, 2022

आमाला बी द्या की आगीनगाडी

 घाटनांदुर -अंबाजोगाई-केज-नेकनूर-बीड असा मार्ग करावा.

 गेल्या पन्नास वर्षा पासुन पहात आलेल रेल्वेच स्वप्न 65 किलोमीटर वर येऊन थांबल,बीड जिल्ह्य़ात तर आल पण अजून जामखेड म्हणजेच नगर जिल्हा वोंलाडून यायच बाकी आहे.पण आम्ही अंबाजोगाई-केज नेकनूर या जनतेला रेल्वे अजून दुरच आहे.नगर वरून जाणारी, रेल्वे कधी काळी नेकनूर-केज-अंबाजोगाई-घाटनांदुर मार्गे जाणार होती,तसा सर्वे सुद्धा झाला होता पण बीड च्या त्यावेळेस च्या तत्कालीन खासदारांनी जास्त खर्च लागतो असे दर्शवून रेल्वे त्या मार्गे घेऊन गेले.जिल्हातील आता फक्त तिनच तालुके जोडले गेले,जर केज मार्गे गेली असती तर सहा तालुके व एक नेकनूर सारखे तालुक्या सारखे ठिकाण जोडले गेले असते.पण जाऊद्या आता ही हे स्वप्न पुर्ण होऊ शकत!!घाटनांदुर ते अंबाजोगाई या रेल्वे मार्गाची मागणी खुप जुनी आहे याला जोडूनच जर ती रेल्वे केज-नेकनूर व्हाया बीडला जोडली तर खुप बरे होईल तसेच अंबाजोगाई ते लातूर हे 60 किलोमीटर चे अंतर जोडले तर तो एक दक्षिणीला जोडणारा पर्याय होऊ शकतो.तसेच उस्मानाबाद,सोलापुर या मार्गे कर्नाटक या दक्षिणे कडील मार्गास केज ते ढोकी फक्त 44 किलोमीटर चे अंतर जोडले तर हा सुद्धा मार्ग होऊ शकतो त्या मुळे उस्मानाबाद जिल्ह्य़ातील एक तालुका कंळब हा रेल्वे ने जोडला जाईल.दक्षिणे कडुन खान्देशास जोडणारा सोलापूर-जळगाव हा मार्ग प्रस्तावित आहे पण “औरंगाबाद वरून का जालन्या वरून” याच्यात भिजतघोंगड अडकून पडले आहे.
जर हे आंदोलन प्रत्येक पक्षाच्या युवा नेते कार्यकर्त्याने हातात घेतले तर स्वप्न काही दुर नाहीत.इच्छा शक्ती पाहीजे तिन्ही तालुक्यातील युवकांनी अंदोलानाची दिशा ठरवून कृती समीती स्थापण केली तर हे होऊ शकते.आपल्या ही तालुक्यात रेल्वे येऊ शकते.
उठा एक व्हा रेल्वे मिळेल 100%

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!