ऊसाच्या वजनात काटामारी करणाऱ्या राज्यातील दोनशे साखर कारखानदार पांढऱ्या कपड्यातील दरोडेखोरांचा काटा काढणार:-माजी खा.राजू शेट्टी
==================================
युसूफवडगाव ऊस ,सोयाबीन परिषदेत हजारो शेतकऱ्यांनी एकीची वज्रमूठ आवळली!!
==================================
केज/प्रतिनिधी
बीड ऊस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सोमवारी सायंकाळी 7 वाजता केज तालुक्यातील युसूफवडगाव येथे हजारो शेतकरी संख्येने ऊस, सोयाबीन उत्पादक शेतकरी परिषद संपन्न झाली.
या परिषदेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी संबोधित केले राज्यातील ऊस उत्पादकासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निर्वाणीचा लढा केला असून साखर उतारा चोरी, काटामारी च्या विरोधात “स्वाभिमानीने” रणशिंग फुंकले आहे. येणाऱ्या 7 नोव्हेंबर ला पुण्यातील साखर संकुलावर राज्यातील 200 साखर कारखान्यांचे वजन काटे ऑनलाईन करा या प्रमुख मागणीसाठी “धडक मोर्चा”चे आयोजन केले आहे या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करत ऊस वजनात काटामारी मारणाऱ्या राज्यातील 200 साखर कारखानदार पांढऱ्या कपड्यातील दरोडेखोरांचा काटा काढणार असल्याचा घणाघात माजी खा. राजू शेट्टी यांनी केला. यावेळी परिषदेत 7 ठराव मंजूर करण्यात आले.
ऊसाला पहिली उचल 2900 रु व सरासरी एफआरपी +350 रु अंतिम दर द्या, साखर कारखान्यांचे वजन काटे ऑनलाईन करा सोयाबीन ला 8600 रु प्रती क्विंटल भाव द्या मांजरा धरणातील अतिरिक्त संपादित क्षेत्राचा मावेजा विलंब व्याजासह द्या 2020,2021,2022 चा पीकविमा, अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रु नुकसान भरपाई द्या.आदी मागण्याचे ठराव शेतकऱ्यांनी हात उंचावून मंजूर केले. स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी साखर उतारा व काटामारी ,ऊसातील उपपदार्थापासून मिळणारे फायदे,आदि अर्थगणित रोखठोक समजावून सांगत साखर कारखानदारांची चोरी हाणून पाडण्यासाठी, यापुढे मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हक्काच्या दाम मिळून घ्यायचे असतील रस्त्यावर प्रकर्षाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यासोबत राहि राहिले पाहिजे असे आवाहन प्रा.डॉ. जालंदर पाटील यांनी केले. बीड जिल्ह्यात गेल्यावर्षी अंदाजे 50 लाख टन ऊस विक्रमी गाळप झाला असून सरासरी साखर उतारा 13 टक्के खरा-खुरा असताना येथील साखर कारखानदारांनी संगनमत करून 3 ते 2.5टक्के साखर उतारा कमी दाखवून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कमी दर दिला तसेच वजनात गाडीला 2 ते 2.5 टन चोरी केली.साखरेला आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी असून याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना झाला पाहिजे साखर व इथेनॉल निर्मितीला सरकारने प्रोत्साहन दिले असून ऊसापासून उपपदार्थ तयार करून साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांचाही विचार करावा व उसाची रिकवरी फडातच तपासून सरासरी एफ आर पी नुसार अंतिम दर निश्चित करून तोडचिट्टीप्रमाणे दरचिट्टी द्यावी यावर्षी गळीत हंगाम सर्व वजन काटे ऑनलाईन करूनच चालु करावेत अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते ,शेतकरी कारखाना बंद पाडून आक्रमक आंदोलन करतील असा आक्रमक इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी दिला.
या ऊस, सोयाबीन परिषदेच्या अध्यक्षस्थानी बब्रूवान कणसे होते मंचावर नगरसेविका पल्लवी रांजणकर, रवींद्र इंगळे डॉ. उत्तम खोडसे, गोविंद शिनगारे, शिवदास थळकरी,रमेश पाटील, सतीश भाऊ शिंदे होते. राचलिंग पाटील, गुरुप्रसाद थळकरी, ओम खरबड, अण्णा सावंत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी तालुकाध्यक्ष अतुल गवळी, शहराध्यक्ष फिरोज भाई पठाण, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद पांचाळ, तालुका संघटक अशोक साखरे नारायण काकडे, पिंटू ढोबळे, काशिनाथ इंगळे नाना हंडीबाग, रामदास नांदे, आदिंनी ऊस, सोयाबीन परिषद यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.
परिषदेचे सूत्रसंचालन पत्रकार डॉ. हनुमंत सौदागर यांनी केले तर आभार प्रदर्शन गुरुप्रसाद थळकरी यांनी मानले. शेतकरी एकजुटीची शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.