बीड जिल्ह्याचा एक पदाधिकारी फाटक्या तोंडासाठी ओळखले जातात.त्यांच्या बोलण्याने वागण्याने स्थानिक पातळीवर पक्षातील अनेक जन दुखावलेले आहेत.पंरतु संबंधितांचे वरिष्ठांत इतके वजन आहे की वजन कसले हो,वरिष्ठांच्या कानात कधी काय सांगेल त्याचा पत्ता नाही.त्या मुळे कोणाकडे तक्रार करण्याची सोयच नाही.त्यामुळे निमुटपणे सहन केले जाते.स्वतःच्या गावात वजन नसलेले हा पदाधीकारी सतत वरिष्ठाच्या कानाला लागलेला असतो.तालुक्यात गावचे गावच भाजपचे असल्याने,सगळी गाडी मिच ओढतोय असा झालेला समज आहे.हे मतदान देतोय तर आम्ही काय गोट्या खेळतात का? असा भाजप पदाधिकाऱ्यांत तालुक्यात चर्चा आहे.जो सत्तेत त्याचा कानफुक्या असी प्रतिमा झालेला हा पदाधिकारी कधी सुधारेल किंवा वरिष्ठांच्या लक्षात येईल याची जोरदार चर्चा पदाधिकाऱ्यांत आहे.आपल्या समर्थक दोन चार पदाधिकाऱ्यांची टिम बनवून दबावतंत्राचा वापर करणाऱ्या पदाधिकाऱ्यांला आता कार्यकर्ते तसेच नेतेच वैतागले आहेत.भाजप च हे ग्रहण कधी सुटेल असा प्रश्न केज तालुक्यातील भाजप कार्यकर्ते विचारू लागले आहेत.