मस्साजोग शिवारात अवैध गुटख्या वर झापा;९ लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त.
सहाय्यक अधीक्षक वेंकटराम यांच्या सह पथकाची कारवाई.
रोखठोक न्यूज वार्ताहर
केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांच्या पथकाने मस्साजोग (ता. केज) शिवारात छापा मारून शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये साठवून ठेवलेला दहा लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी रोहित आसाराम देशमुख विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
मस्साजोग (ता. केज) येथील रोहित आसाराम देशमुख याने काळेगावघाट रस्त्यावरील रंजीत बाजीराव देशमुख यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये गुटख्याचा साठा करून ठेवल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांनी मिळाली. त्यांनी फौजदार जावेद कराडकर, फौजदार
अमिरोद्दीन इनामदार, जमादार बालासाहेब डापकर, विकास चोपणे, धोंडीराम मोरे, विशाल क्षीरसागर, आशपाक इनामदार यांचे पथक पाठवून दिले. या पथकाने १७ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता अचानक सदरील ठिकाणी छापा मारला. पत्र्याच्या शेडची झडती घेतली असता पांढऱ्या, निळ्या, गुलाबी रंगाच्या पोत्यासह पिशव्या व खोक्याध्ये महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला व राज्यात प्रतिबंधीत केलेला गुटखा सुगंधीत तंबाखु व पान मसाला मिळून आला. पोलिसांनी दहा लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. फौजदार अमिरोद्दीन इनामदार यांच्या फिर्यादीवरून रोहित देशमुख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर रोहित देशमुख हा फरार झाला आहे.
